नागपूर येथे बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त केले विनम्र अभिवादन .
नागपूर येथे बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त केले विनम्र अभिवादन .
ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख
नागपूर : (११ जून) पाणी , जंगल आणि भूमीसाठीची लढाई शतके जुनी आहे. या लढाईत शेकडो नायक आले आणि गेले, परंतु हा लढा आजही कायम आहे. आज आम्ही आपल्याशी या लेखात अशा मोहक आणि बंडखोर नेत्याबद्दल बोलत आहे ज्याच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणि त्यांनी इंग्रजांना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजांवर वार केले. आम्ही बोलत आहे आदिवासी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्याबद्दल जे एक आदिवासी नेते आणि लोकनायक होते. ब्रिटीशांविरूद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा जननायक मुंडा जातीचा होता. सध्याच्या भारतात रांची आणि सिंहभूमीचे आदिवासी बिरसा मुंडाला ‘बिरसा भगवान’ म्हणून ओळखतात. आदिवासींवर होत असलेल्या इंग्रजांच्या दडपणाविरूद्ध बिरसा मुंडा यांनी जो लढा लढविला त्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे .
बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र च्या आदिवासी भागात बिरसा मुंडाची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.
आदिवासी समाजातील क्रांतिकारी चळवळ निर्माण करुन इंग्रजांच्या विरोधात ऐलांने जंग उभी करणारा "हुतात्मा योध्दा-बिरसा यांची 9 जूनला देशभरासह नागपूर जिल्हातही मोठ्या प्रमाणात "भावपूर्ण आदरांजली सोहळा" कार्यक्रम आयोजित करून यांचा शहीद दिवसानिमीत्त पश्चिम नागपूर फुटाळा चौक येथील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास भाजप महानगर अध्यक्ष आ.श्री. प्रविनजी दटके आणि माजी महापौर श्रीमती मायाताई ईवनाते यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी अ.जमाती आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री महेंद्रजी ऊईके , महानगर अनु.जमाती आघाडी अध्यक्ष श्री. रविंद्रजी पेंदाम माजी नगरसेविका रूतिकाताई मसराम , मा.नगरसेवक प्रमोद कौरती , शहर महामंत्री दिलीप मसराम , अध्यक्ष प.नागपूर श्री प्रशांत कूमरे , ज्ञानेश्वरराव गुरुजी , वार्ड अध्यक्ष श्री यशवंतजी चौकसे , महामंत्री राजेश मरसकोल्हे , मोनु धुर्वे , बबिताताई धुर्वे आणि कार्यकर्ते व मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील लोकांनी विनम्र अभिवादन करून आपली उपस्थिती दर्शिविले .