प्रवरानगर बाजारात चोरांचा सुळसुळाट: मोबाईल_पाकीट_सोनसाखळी वर डल्ला.

प्रवरानगर बाजारात चोरांचा सुळसुळाट: मोबाईल_पाकीट_सोनसाखळी वर डल्ला.

प्रवरानगर बाजारात चोरांचा सुळसुळाट: मोबाईल_पाकीट_सोनसाखळी वर डल्ला.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_9370328944.

सविस्तर_राहता तालुक्यात प्रवरानगर येथे दर रविवारी आठवडा बाजारात असतो, प्रवरानगर येथे औद्यगिक वसाहत, शैक्षणिक संस्था असून_विखे पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे प्रवरापरिसर सुजलाम सुफलाम आहे, त्यामूळेच प्रवरानगर आठवडा बाजारात महीला, पुरुषांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, याच गर्दीचा फायदा घेऊन, कमी दिवसात करोडपती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या भुरट्या चोरांनी, प्रवरानगर आठवडा बाजारात आपला हात सफाईचा धंदा जोरात सुरू केला आहे, तसेच सदरील चोरांचा धंदा तेजीत सुरू असल्याने अनेक गोरगरीब कष्टकरी लोकांचे मोबाईल, पाकीट, सोन्याचे दागिने चोरी होऊन महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

पोलिस स्टेशन ची कटकट नको म्हणून, अनेक लोक तक्रार दाखल करण्यास देखील टाळाटाळ करतात, त्यामूळे भुरट्या चोरांचां श्रीमत होण्याचा मार्ग मोकळा होतांना दिसत आहे, तसेच भुरट्या चोरांच्या मुसक्या देखील आवळल्या जात नाहीत, त्यामूळे चोरीच्या घडलेल्या घटनेची रीतसर तक्रार दाखल करावी, तरच येत्या काळात चोरीच्या घटनांना आळा बसेल.

प्रवरानगर आठवडा बाजारातील चोर हे, परिसरातीलच एखाद्या अकाची मदत घेऊन, करोडपती होण्याचे स्वप्न तर बघत नाही ना, अशी चर्चा आता प्रवरापरिसात दबक्या आवाजात चालू आहे.

लोणी पोलिसांनी आठवडा बाजारात घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास करून, सदरील भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळून, प्रवरानगर आठवडा बाजारात गस्त घातल्याशिवाय, परिसरातील व आठवडा बाजारातील चोरीच्या घटना थांबणार नाहीत, अशी मागणी जनतेतून होतांना दिसत आहे.