शिरेगाव येथे नर्मदा जयंती व कन्या पूजनाचा भव्य कार्यक्रम संपन्न.
शिरेगाव येथे नर्मदा जयंती व कन्या पूजन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे
प्रतिनिधी:-खेडले परमानंद
शिरेगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागाने शिरेगाव या ठिकाणी रथसप्तमी व नर्मदा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कन्या ला मानाचे स्वरूप देऊन कन्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला कुमारिका मुलींना भेटवस्तू देऊन त्यांची पूजा करण्यात आली त्याच प्रमाणे त्यांची गावातून मिरवणूक काढून कन्यापूजन करण्यात आले. समाजातील वाढत्या विकृतीला बदलण्यासाठी कन्या पूजन करून कन्येचा जो सन्मान केला आहे तो कौतुकास्पद आहे. नर्मदा परिक्रमा केलेले श्री एकनाथ मोहन जाधव यांनी सांगितले की नर्मदामाता मुलीच्या कन्येच्या रूपाने एकदातरी भेट देते आणि प्रत्येक भेटणाऱ्या मुलीचा सन्मान करणे हे समाजाचे काम आहे.
मिरवणुकीच्या कार्यक्रमांमध्ये लहान-थोर सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला फुगडी, नाच ,सनई चौघडा अशा थाटात मिरवणूक सोहळा पार पडला.
शिरेगाव ग्रामस्थांच्यावतीने मिरवणूक सोहळा पार पडल्यानंतर मुळा नदीला साडी अर्पण करण्यात आली जवळ जवळ पाचशे मीटर अंतराची ही साडी होती व होडी च्या साह्याने ती संपूर्ण नदीपात्र ला समर्पित करण्यात आली. मुळा नदीची विधिवत आरती करून पूजा करण्यात आली. आजपर्यंत च्या कालखंडातील हा पहिलाच अद्वितीय असा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रतिनिधी संभाजी शिंदे