अहमदनगर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची श्रीरामपूर मध्ये मोठी कारवाई

अहमदनगर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची श्रीरामपूर मध्ये मोठी कारवाई

अहमदनगर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची श्रीरामपूर मध्ये मोठी कारवाई..!!

श्रीरामपूर-

नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात मंगलसूत्र चोरून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांना फार दिवसा पासून पोलिसांच्या रडारवर असणाऱ्या चोरांना अखेर नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण  शाखेच्या पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूमस्टाईलने ओढून मोटार सायकलवरुन पोबारा करणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना काल अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.बऱ्याच दिवसा पासून पोलिसांना ही टोळी हातावर तुरी देत होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींन कडून सात लाख पासष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या करवाईत मात्र या टोळीतील दोन आरोपी  पसार होण्यात यशस्वी ठरले.पोलीस त्या  आरोपींचा कसून शोध घेत आहेत.अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गाडीवर येवून बळजबरीने ओरबाडून पळून घेऊन जाणार्‍या गुन्हेगारांच्या शोधाच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास सुरु केला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील विशाल बालाजी भोसले हा त्याचे साथीदारांनी चैन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे,अशी खबर पोलिसांना  मिळाली होती . त्या मिळालेल्या खबरी नुसार नुसार पोलिसांनी सापळा लावून विशाल बालाजी भोसले या अट्टल गुन्हेगाराला श्रीरामपूर येथील मेनरोड  येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळच ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कडे एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत सोन्याचे दागिने व दोन सोन्याच्या लगड आढळल्या. त्याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे सोने श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील संदीप दादाहरी काळे, नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील लहू बबलु काळे व श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील योगेश सिताराम पाटेकर यांचे असल्याचे सांगीतले. अहमदनगर शहर, संगमनेर व नाशिक येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून आणलेले सोने असल्याचेही त्याने कबुल केले. दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे विशाल भोसले याने पोलिसांना सांगितले.अहमदनगर जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख तपासले असता आरोपींवर एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. या टोळीनेच हे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यात भिंगार, कोतवाली, संगमनेर तालुका, संगमनेर शहर, श्रीरामपूर तालुका, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय, आडगाव, नाशिक आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.टोळीचा सुत्रधार व त्याच्या साथीदारांचा शोध घेत असताना संदीप दादाहरी काळे यास वडाळा महादेव परिसरात पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले.विशाल बालाजी भोसले व संदीप दादाहरी काळे या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी साथीदार लहू बबलू काळे (पसार) रा. पळसे कारखाना, ता. जि. नाशिक व योगेश सिताराम पाटेकर (पसार) रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यांच्यासोबत मिळून हे गुन्हे केल्याचे सांगितले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, विश्वास बेरड, संदीप पवार, भाऊसाहेब कुरुंद, पो.ना. शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रोहित यमुल, आकाश काळे, योगेश सातपुते व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांनी ही कामगिरी बजावली.