*खडांबे बुद्रुक तालुका राहुरी येथील काही शेतकऱ्यांच्या पिकावर गावातील समाजकंटकांकडून विषारी औषधाची फवारणी करून पीकाचा नाश करण्याचा प्रयत्न*
बुधवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२२, रोजी रात्रीच्या सुमारास खडांबे बुद्रुक शिवारात श्री भाऊसाहेब मोहन गायके, श्री रघुनाथ मोहन गायके, श्री राजेंद्र भाऊसाहेब काचोळे, श्री प्रसाद आबासाहेब काचोळे. तसेच सौ कांताबाई अरुण तोंडे, सर्व राहणार खडांबे बु यांच्या शेतातील उभ्या असलेल्या कपाशीवर टमाटे पिकावर काही समाजकंटकांकडून तन नाशकासारखा अति विषारी औषधाची फवारणी करून पिकाचा नाश केला आहे. सदर हा प्रकार बुधवारी रात्री घडल्यानंतर शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या शेतात बघितल्यावर प्रत्येकाच्या शेताच्या रस्त्याच्या बाजूने काही कपाशीच्या सऱ्या जळू लागल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले, त्यावर कोणीतरी तन नाशकाची फवारणी केल्यामुळे या पिकाला नुकसान झाले आहे असे शेतकऱ्यांच्या लक्षात आले, यावेळी शेतकरी राजेंद्र भाऊसाहेब काचोळे यांनी सदर कपाशीची पाहणी करण्याबाबत व काय प्रकार असावा या बाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना भेटले असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हा विषय आमचा नसून तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा असे सांगितले व तालुका अधिकारी कृषी अधिकारी यांच्या कडे हा घडलेला प्रकार सांगितला अद्याप राहुरी तालुका कृषी अधिकाऱ्याचे कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी या पाहणीसाठी आलेले नाही शनिवार व रविवार सुट्टीचे कारण सांगून सोमवार नंतर पीक पाहणी करून पंचनामा करण्यात येईल असे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, जे कोणी हे कृत्य केले त्यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे , सदर विषय मा आ प्राजक्त तनपुरे यांच्या स्वीय सहाय्यक श्री विजय टापरे यांना देखील सांगण्यात आला आहे , तसेच सदर माहिती गावचे तलाठी भाऊसाहेब यांच्या देखील निदर्शनास आणून दिली आहे तसेच खडंबे गावच्या ग्रामसेवक मॅडम यांना देखील सदर घटनेची माहिती कळविण्यात आली आहे तरी बुधवारी रात्री ज्या समाजकंटकाने हा फवारा मारण्याचा प्रयत्न केला यांचा उलगडा होण्यासाठी गावातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहे व जे कोणी कृत्य करणारे आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी असे खडांबे गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे...!