नेवासा नगरपंचायतला आम आदमी पार्टीचा दणका ,भोंगळ व अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात उपोषण सुरु .

नेवासा नगरपंचायतला आम आदमी पार्टीचा दणका ,भोंगळ व अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात उपोषण सुरु .

नेवासा नगरपंचायतच्या भोंगळ व अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने उपोषण सुरू .

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा .

 

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा नगरपंचायतच्या भोंगळ व अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजी नेवासा शहरातील नगर पंचायतच्या मुख्य चौकात उपोषण केले.शहराच्या प्रलंबित व महत्वाच्या प्रश्नांवर उपोषण असल्याने या उपोषणाला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सर्वधर्मीय नगरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळाला शहराच्या प्रलंबित व महत्वाच्या प्रश्नांवर उपोषण असल्याने 

            या उपोषणामध्ये आम आदमी पार्टीचे युवा नेते विधी तज्ञ अँड.सादिक शिलेदार,तालुकाध्यक्ष राजेंद्र आघाव, तालुकासचिव प्रविण तिरोडकर,शहराध्यक्ष संदीप आलवणे, तालुका उपाध्यक्ष देवराम सरोदे,अण्णासाहेब लोंढे,युवक आघाडी अध्यक्ष दीपक गायकवाड, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष सलीम सय्यद,स्वप्नील सोनकांबळे हे पदाधिकारी सहभागी झाले होते.

      या उपोषणस्थळी भाजपचे नगरसेवक इंजिनियर सुनील वाघ,काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजनदादा जाधव,राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संतोष काळे सर,वसुंधरा प्रतिष्ठानचे अमृत फिरोदिया,शिवसेनेचे नगरसेवक फारूकभाऊ आतार,भाऊसाहेब वाघ,चिकन सप्लायर्स व्यापारी हारुणभाई जहागीरदार,फारूकभाई कुरेशी,शफीक जेटली,व्यापारी रहेमानभाई शेख,राज महंमद शेख,प्रेस क्लबचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार मकरंद देशपांडे,रमहूशेठ पठाण,लतीफ पठाण यांच्यासह टपरीधारक संघटनेचे पदाधिकारी,एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, मच्छी मार्केट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

  शास्तीकर(मालमत्ता करांवरील दंड व्याज)माफ करण्यात यावा,जुन्या अतिक्रमण धारकांना प्राधान्याने गाळयांचे वाटप करण्यात यावे,अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून शहरातील जागांचे आरक्षणे घोषित केलेले आहेत तसेच प्राचीन तसेच प्राचीन श्रीराम मंदिराच्या जवळ लोक भावनेचा विचार न करता मच्छी मार्केटचे आरक्षण घोषित केलेले आहे ती सर्व आरक्षणे रद्द करण्यात यावी,नगरपंचायत कार्यालय ही शहराची शान असून सदरचे कार्यालय हे शहराच्या बाहेर हलवू नये त्यामुळे नेवासा शहरातील ९० टक्के जनतेस जाण्या व येण्याचा खर्च व त्रास सहन करावा लागणार असून शहरातील व्यापारावर त्याचा परिणाम होणार आहे.

    नेवासा शहर हे तीर्थक्षेत्र भूमी असून देखील येथील हमरस्त्यावर एक ही स्वच्छता गृह नसल्याने पुरुष व महिला भाविकांची मोठी कुचंबना होत आहे तसेच ज्ञानाची भूमी असून ही येथे साधे वाचनालय सुद्धा नसल्याने तसेच शहरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण व उद्यान देखील नसल्याने यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी असे मागण्याच्या दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे .

        उपोषणस्थळी मंगळवारी सकाळपासून उपोषण सुरू झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला नागरी सुविधा व प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतांना दिसत होते.