दीपक बर्डे हत्या प्रकरणातील पीडित बर्डे कुटुंबाला राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष श्री .सागर भाऊ बेग यांच्या हस्ते देण्यात आली 1 लाख रु.ची .आर्थिक मदत .

दीपक बर्डे हत्या प्रकरणातील पीडित बर्डे कुटुंबाला राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष श्री .सागर भाऊ बेग यांच्या हस्ते देण्यात आली 1 लाख रु.ची .आर्थिक मदत .

              श्रीरामपूर  तालुक्यातील भोकर येथील दिपक बर्डे हत्या प्रकरणातील पिडीत बर्डे कुटुंबाला जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून जमा केलेल्या रोख एक लाख रुपयांची आर्थिक मदत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष श्री.सागर भाऊ बेग यांच्या हस्ते देण्यात आली.*

     

     *मुस्लिम मुलीच्या प्रेम प्रकरणावरून चार महिन्यांपूर्वी राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आदिवासी युवक दिपक बर्डे हत्या प्रकरणाला राष्ट्रीय श्रीराम संघाने वाचा फोडली वेळोवेळी निवेदने देऊन हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी श्रीराम संघाने केली राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री आ. अशोक उईके व आ. नितेश राणे यांच्या प्रमूख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून श्रीरामपुरात भव्य असा मोर्चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयावर नेऊन आरोपींना तात्काळ अटक करून दिपक बर्डे या आदिवासी तरुणाच्या कुटुंबाला न्याय द्यावा म्हणून मागणी करण्यात आली.त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे.*

 

    *बर्डे कुटुंबाच्या कर्त्या तरुण मुलाची हत्या झाल्याने बर्डे कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत बर्डे कुटुंबाला राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते नुकतीच देण्यात आली.*

 

    *याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष अनिल भाऊ थोरात ,शहरप्रमुख अमित मुथा,प्रदीप जाधव,श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब थेटे,आकाश भाऊ बेग,सनी जाधव ,सोनू भाऊ बेग,सागर शिंदे,संघर्ष दिघे,अजिंक्य काथे,ललित राऊत,विशाल जाधव व जयंत थेटे असे असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.*