हरिहर केशव गोविंद बन एक आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र- दुग्ध विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

हरिहर केशव गोविंद बन एक आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र- दुग्ध विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
हरिहर केशव गोविंद बन एक आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र- दुग्ध विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

शुक्रवार 23 मे रोजी अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यासाठी बेलापूर येथे आले होते.सायंकाळी ‌‌साडेसात वाजता बेलापूर बनात हरिहर केशव गोविंद देवतेचे दर्शन घेऊन मंदिराच्या सभामंडपाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ नारळ वाढवून त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बेलापूर पंचक्रोशीतील नागरिक , कार्यकर्ते, उद्योजक , भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव गोविंद संस्थान बनचे अध्यक्ष सतीश भगत यांनी केले. बनात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती देऊन पूढील योजना व महाराष्ट्र सरकार कडून अपेक्षित सुविधांची मागणी या वेळी त्यांनी केली. पुराणात बेलापूर बन, उक्कलगाव व बेलापूर बुदृक  या तिन्ही ठिकाणी असलेल्या केशव गोविंद मंदिराच्या पायी त्रिस्थळी यात्रेचे काशी दर्शनाचे पुण्य प्राप्त होते असा कृपाशीर्वाद असल्याने हजारो भाविक त्रिस्थळी करतात. परंतु बहुतेक वेळा नदी मध्ये पाणी असल्याने यात अडथळा येतो आणि म्हणूनच या ठिकाणी शासनाने पुलाची उभारणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या वेळी संस्थेच्या वतीने मंत्री महोदयांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

       आपल्या भाषणात ना राधाकृष्ण विखे यांनी बनातील विश्वस्त व्यवस्थेच्या कामाचे कौतुक केले व या परिसरात आल्यावर चैतन्याची अनुभूती येते असे उद्गार काढले. या ठिकाणी अध्यात्मा बरोबर पर्यटन विकास आणि धार्मिक शिक्षणासाठी वाव असल्याचे सांगितले. शासनाचे व आपलेही सहकार्य सर्व कामात राहील अशी ग्वाही देत पुढिल कामांचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.ज्येष्ठ विश्वस्त बापूसाहेब पुजारी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर भगत यांनी केले.