बहिरवाडीच्या प्रसिद्ध काळभैरवनाथ देवस्थानचा ब वर्गामध्ये समावेश करण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - माजी सरपंच सुनील हारदे .
*श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बहिरवाडी या देवस्थानचा समावेश ब वर्ग मध्ये करण्यासाठी पालकमंत्र्याकडे पाठपुरावा करणार..... माजी सरपंच सुनील हारदे .
नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध व जगात नावलौकिक असलेले कालभैरवनाथ जागृत देवस्थान तिर्थक्षेत्र बहिरवाडी येथे श्री.काल भैरवनाथ जन्मोत्सव व चैत्र पौर्णिमेस यात्रा ऊत्सव भरत असतो . तसेच पौष महिन्यातील रविवारसह महिनाभर देशभरातील सर्व जाती धर्माचे भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात .देवस्थान येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरु असतात .दर रविवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात येतो. आपल्या घरातील शुभकार्य व धार्मिक कार्यक्रमासाठी देवगडचे पुज्यनिय बाबाजींचे मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या मदतीने भव्य दिव्य असे प्रवरामाईच्या मध्य धारेवर श्री कालभैरवनाथाचे सुंदर असे मंदिर बांधण्यात आले तसेच भव्यदिव्य ज्ञानसागर किर्तन मंडप ऊभारण्यात आला आहे. पाकशाळा तसेच भाविकांना मुक्कामासाठी विश्राम निवास आहे .सध्या देवस्थानचा क वर्ग विकास आराखड्यातुन व भाविकांचे योगदानातुन विकास सुरु आहे. परंतु भाविकासाठी येण्या जाण्यासाठी रस्त्याची मागील दोन वर्षापासून रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे ठिकठिकाणी मोठे खड्डे व काही ठिकाणी रस्ता खचल्यामुळे भाविकांना येण्या जाण्यासाठी अनेक हाल सहन करावे लागत आहे .नेवासा बुद्रुक ते कालभैरवनाथ मंदिरापर्यंत रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे व देवस्थान साठी लागणारी जवळच असणारी वनखात्याची तीन एकर जमीन देवस्थानच्या नावे वर्ग करण्यात यावी व कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा समावेश ब वर्गात करण्यात यावा यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत बहिरवाडी व देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली या आणि इतर सर्व मागण्यासाठी लवकरच नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पशुसंवर्धन व महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे बहिरवाडी गावचे माजी सरपंच श्री सुनील शिवाजी हारदे सोबत ग्रामस्थ राजेंद्र वाखुरे वआदिनाथ पटारे यांनी सांगितले .