संत सावता महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतले दर्शन.
बालाजी देडगाव:- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श तांबे वस्ती येथील संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून काल गावभर मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
या दोन्ही मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली .तर कलश
हि मिरवण्यात आला. महिलांच्या डोक्यावरील कलश या मिरवणुकीचे आकर्षण ठरले .तर फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये व टाळ पखवाद विना या वादकासह हरिनामाच्या गजरात गावभर मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली .या मिरवणुकीत माळी समाज व सर्व धर्मियांनी सहभाग घेतला होता.
तर आज दिवसभर होम हवनाची पूजा करण्यात आली. प्रायचित्त, प्रधान संकल्प ,गणपती पूजन पुण्यहावाचन ,नांदीश्राद्धत कर्म, पीठ देवता स्थापना व महाआरती चे नियोजन करण्यात आले होते. तर ही पूजा ब्राह्मण देवांच्या हस्ते करण्यात आली. पूजेसाठी तरुण युवक जोडीने बसले होते.
तरी श्री संत सावता देवस्थानच्या वतीने उद्या सोमवार रोजी पूजन ,मूर्ती स्थापना,कलशारोहण पूर्णाहुती, व महाआरती करून मूर्ती स्थापने निमित्त सकाळी 9 ते 11 गुरुवर्य ह .भ. प .मीराबाई महाराज मिरीकर यांचे कीर्तन होईल. तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख संत मंडळी व मान्यवर ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प रविकांत महाराज वसेकर, ह भ प दादा महाराज वायसळ, ह भ प नंदकिशोर महाराज खरात, ह भ प भागचंद महाराज पाठक, ह भ प गणेश महाराज चौधरी, ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह भ प अंकुश महाराज कादे, श्री कल्याण काका आखाडे, माजी मंत्री ,आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब ,माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , मा.सभापति कारभारी जावळे, जागतिक आरोग्य सल्लागार अर्जुन सूसे, मयूरजी वैद्य ,राजीवजी काळे सर, निखिल शेलार सर, असे प्रमुख मान्यवर जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .तरी देडगाव परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे देवस्थानच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.