दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने उद्या 24 रोजी पुरस्कार सोहळा.

दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने उद्या 24 रोजी पुरस्कार सोहळा.

*दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने उद्या 24 रोजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.*

       नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे यांच्या परिश्रमाने ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे. कमी दिवसात अतिशय नावलौकिक कमावणारी व विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण पराक्रम करणारी संस्था पोलीस दलाला कायम मदत करणारी नामांकित संस्था अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्कार असल्याने या संस्थेच्या वतीने ही 2024 - 25 विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंताचा गौरव उद्या दिनांक 24 रोजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संग्राम भैया जगताप ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ,सुधीर पाटील प्रांत अधिकारी ,अमोल भारती डी वाय एस पी ,मनोज कुमार ससे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ,संजय शिंदे तहसीलदार ,अविनाश मिसाळ भूमिलेख अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.

      युनूस शरीफ पठाण बालाजी देडगाव आदर्श पत्रकारिता पुरस्कार तर संजय वायकर ,रफिक शेख, योगेश गुंड ,हेमंत साठे, शिवहरी म्हस्के शशिकांत पवार ,अन्सार शेख ,अनिकेत गवळी, संजय ठोंबरे ,बाळासाहेब गदादे, सौ. पल्लवी चांदगुडे, शिवाजी लगड यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सुनील चोंभे, जयंत कुलकर्णी, गजेंद्र राशिनकर, श्याम कांबळे यांना आदर्श संपादक पत्रकार पुरस्कार मिळणार आहे. तर परसराम जगधने सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, रामदास फणसे आदर्श ग्रामसेवक ,बाबासाहेब काळे आदर्श उपसरपंच ,रोहित करांडे आदर्श डॉक्टर पुरस्कार ,आरिफ पठाण सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, कैलास बहिर आदर्श तलाठी पुरस्कार, तर बाबासाहेब बोरसे आदर्श पोलीस निरीक्षक पुरस्कार , विजयकुमार पोकळे आदर्श प्राचार्य पुरस्कार ,प्रकाश धोंडे उत्कृष्ट अधिक्षक पुरस्कार ,शिवाजी कावरे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार असे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत पुरस्कार जाहीर झाले आहेत.द

     पुरस्कार त्यांना सन्मानाचे स्वरूप शाल ,श्रीफळ ,सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

       तरी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह अहमदनगर येथे पुरस्कार सोहळा पार पडणार आहे अशी माहिती दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक शहादेव मुंगसे यांनी दिली.