देडगावची अभ्यासिका झाली तरुणासाठी दीपस्तंभ पोलीस होऊन दोन तरुणाची गगन भरारी गगन भरारी.

देडगावची अभ्यासिका झाली तरुणासाठी दीपस्तंभ पोलीस होऊन दोन तरुणाची गगन भरारी गगन भरारी.

*देडगावची अभ्यासिका झाली तरुणांसाठी दीपस्तंभ....*

बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस

पठाण)

माजी विद्यार्थी संघ देडगाव संचलित वैकुंठवासी वांढेकर गुरुजी अभ्यासिकेतील दोन विद्यार्थ्यांची नुकतीच मुंबई पोलीस भरतीत निवड झाली.त्याबद्दल नव्याने निवड झालेले संजय शिवाजी थोरात व बिरूदेव शिवाजी भिसे यांचा सन्मान सोहळा माजी विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेत मोठ्या जल्लोषात साजरा केला. 

2015 सालामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी पदी निवडले जावेत या हेतूने वै.

वांढेकर गुरुजी यांच्या नावाने माजी विद्यार्थी संघ देडगाव यांच्या प्रयत्नाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. आजपर्यंत या अभ्यासिकेच्या माध्यमातून 18 देडगावातील विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कसलेही शुल्क आकारले जात नाही .उलट गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मागील ती पुस्तके मोफत उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे स्वप्नातही सरकारी नोकरीत येऊ शकले नसते असे विद्यार्थी पोलीस प्रशासन, सैनिक दल, नेव्ही, वनपाल,कक्ष अधिक्षक,तलाठी, आरोग्य सेवक,शिक्षक अशा विविध पदावर पोहोचले आहेत.

     नुकत्याच मुंबई पोलीस दला मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये वैकुंठवासी वांढेकर गुरुजी अभ्यासिकेतील दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते अभ्यासीकेत करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी गुणवंत शिक्षक शिवाजी लांघे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नांगरे यांनी केले. यावेळी साहित्यिक बथूवेल डी यांनी रावणाच्या लंकेत ज्याप्रमाणे बिभीषन होता त्याप्रमाणे आजूबाजूची खडतर परिस्थतीत असतानाही थोरात व भिसे यांनी परीक्षेत यश मिळून कुटुंबामध्ये रामराज्य आणण्याचा प्रयत्न केला आहे असे गौवोद्गार काढले.शेतकी अधिकारी संजय वांढेकर यांनी तळागाळातील मुलांनी हे यश संपादन केल्याने वैकुंठवासी वांढेकर गुरुजींच्या आत्म्याला शांती दिली असे भावनिक विचार मांडले. तर महाराष्ट्र पोलीस दलात असलेले कानिफ गोफणे यांनी पोलीस दलात हजर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी चालू ठेवत पोलीस प्रशासनातील विविध पदे मिळवावित अशा शुभेच्छा दिल्या. जिजामाता जुनियर कॉलेजचे प्राध्यापक महादेव बनसोडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याचप्रमाणे यश मिळवण्यासाठी स्वतः संघर्ष करावाच लागतो.जितका संघर्ष मोठा तितके यश ही मोठे असते असे विशद केले. भास्कर तांबे सर यांनी माजी विद्यार्थी संघाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून विविध पदावर विद्यार्थ्यांनी रुजू होऊन समाजाचे व गावाचे नावलौकिक वाढवावे अशी साद घातली. अध्यक्षपदावरून बोलताना शिवाजी लांघे सर यांनी अभ्यासिकेत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी माजी विद्यार्थी संघ नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी सर यांनी करताना अभ्यासिकेचा लाभ देडगावातीलच नव्हे तर नेवासा तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यानी घ्यावी असे आवाहन केले. 

    या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब सावंत , सर्जेराव ससाणे, खंडेश्वर कोकरे ,संजय लाड ,संजय कदम , संभाजी कडू,अनिल पेटे प्रदीप मुंगसे ,सागर बनसोडे,किशोर वांढेकर , बाळासाहेब हिवाळे ,प्रवीण मुंगसे, गणेश मुंगसे ,अक्षय ससाने, आप्पा दळवी , योगेश खैरे ,महेंद्र पवार ,पत्रकार युनूस पठाण आदी मान्यवर उस्थितीत होते.

 सर्वांनी संजय थोरात व बिरूदेव भिसे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार आप्पा दळवी यांनी मानले.