शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या नगर दक्षिण लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी पै.रावसाहेब (नाना) खेवरे यांची निवड .

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या नगर दक्षिण लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी पै.रावसाहेब (नाना) खेवरे यांची निवड .

                    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या नगर दक्षिण लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी पै रावसाहेब( नाना ) खेवरे यांची नुकतीच निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पै रावसाहेब खेवरे हे उत्तर जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून काम पाहत होते त्यांच्या या प्रमुख पदावरून त्यांनी उत्तर भागामध्ये मोठा संपर्क उभा करून यावेळी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी लोकसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेच्या वतीने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रावसाहेब खेवरे यांनी मोठे सहकार्य करून व या प्रत्येक गावोगावी शाखा स्थापन करून शिवसैनिकांची मोठी फळी तयार केली होती .

               या सर्व गोष्टीचा अभ्यास करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्यांचे काम पाहून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देऊन मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे या जबाबदारी पेलण्यासाठी पै खेवरे म्हणाले की पक्षप्रमुखांनी टाकलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावून संघटनेसाठी चांगले काम करून दक्षिण जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त संघटन करून आपल्या पक्षाला त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचे पै .खेवरे म्हणाले . त्यांचे या निवडीचे राहुरी तालुक्यातील व त्याच बरोबरच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .