नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या रवींद्र जाधवच्या रॅकेटचा पर्दाफाश.

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या रवींद्र जाधवच्या रॅकेटचा पर्दाफाश.

प्रतिनिधी:-राहुरी, अहमदनगर

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या औरंगाबाद येथील रवींद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल. खूप मोठ्या रॅकेटचा रवींद्र जाधव हा सर्गणा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

      या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर अशा प्रकारचे अनेक फसवणुकीचे गुन्हे समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

         तेव्हा लवकरात -लवकर रवींद्र जाधव याला अटक करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

       घटनेचा सविस्तर वृत्तांत खालील प्रमाणे.

राज्यात नोकरभरतीच्या घोटाळ्याच्या उच्चांक चालू असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ज्या जागा भरल्या जातात ,त्याच जागेवर चक्क दहावी- बारावी पास मुलाला निरीक्षक पदाचे नियुक्त पत्र देऊन ,त्याच्या शेतकरी वडिलांकडून सहा लाख रुपयांची वसुली करून एका ठकाने मोठा गंडा घातला.

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील ही घटना आहे .

          सदर गोष्टीची फिर्याद मुलाच्या वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिली होती परंतु पुराव्याअभावी रितसर फिर्याद नोंदवली गेली नाही .

     त्यामुळे फसवणूक झालेल्या मुलाचे वडील निराश झाले होते. 

  अखेर बी. पी .एस लाईव्ह चे जिल्हाध्यक्ष पत्रकार कृष्णा गायकवाड यांनी त्यांचे सहकारी मित्र पत्रकार संभाजी भानुदास शिंदे ,माहिती अधिकार पत्रकार नेवासा तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे अँटी करप्शन प्रतिनिधी युवराज शिवाजी म्हस्के यांच्याशी संपर्क साधला व सदर गोष्टीची तक्रार मंत्रालयात देऊन कागदपत्रांचा पाठपुरावा करून हे प्रकरण उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आले.

उत्पादन शुल्क विभागाकडून फिर्यादी पत्रकार बांधव व मुलाच्या वडीलास उत्पादन शुल्क विभागाने बोलावून घेतले.

         व सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ यांनी चौकशीचे आदेश दिले. तपासानंतर चौकशीअंती औरंगाबाद येथे सरकार वाडा पोलीस स्टेशन मध्ये रवींद्र जाधव या ठकावर विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रवींद्र जाधव व त्याच्या साथीदारांचे खूप मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु पुराव्याअभावी अनेकांच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या नाहीत त्यामुळे हा प्रकार कोणाच्याही नजरेसमोर आलेला नव्हता.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र जाधव असे तक्रार दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

           फसवणूक झालेला तरुण त्याचे वडील व पत्रकार यांनी ८ऑगस्ट रोजी नाशिक उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे संबंधित नियुक्तीपत्र व तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाकडून या गोष्टीचा पाठपुरावा करून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम व दुय्यम निरीक्षक पदाची भरती होत असते परंतु दहावी- बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला निरीक्षक पदाची नियुक्ती देण्यात आली होती. प्रथम व दुय्यम निरीक्षकांची पदोन्नती होऊन नंतर त्यांची निरीक्षक पदी नियुक्ती होते.

         सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर सदर तरुणास भुतकर यांनी अधीक्षक मनोहर अचुंळे यांच्यासमोर उभे केले. सर्व प्रकार विभागीय आयुक्त अर्जुन ओहळे यांच्या कानी घालून सर्व विषयाची चौकशीअंती गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता. सदरचे नियुक्ती पत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

      उत्पादन शुल्क विभागाच्या संचालक उषा वर्मा यांनी नियुक्ती पत्राची पडताळणी केली असता. शिक्के व मंत्रालयाचे प्रधान सचिव यांची खोटी स्वाक्षरी असल्याचे जाहीर केले व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार

दाखल करण्याचे काम केले.

      उपाधीक्षक भुतकर यांनी गुन्ह्याची तक्रार केली त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे संजय पिसे हे पुढील तपास करीत आहेत.