शिवांकुर विद्यालयात आजी आजोबा दिन उत्साहात साजरा*

शिवांकुर विद्यालयात आजी आजोबा दिन उत्साहात साजरा*

*शिवांकुर विद्यालयात आजी आजोबा दिन उत्साहात साजरा*

शिवांकुर विद्यालयात आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

 *"आजी आजोबा हे संस्काराचे ज्ञानपीठ आहे त्यांच्याकडून मोलाचे संस्कार मिळत असतात संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले* विद्यालयात आजी आजोबा दिन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी असंख्य आजी-आजोबांनी विक्रमी हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वात आवडीची व्यक्ती म्हणजे आजी आजोबा यांचे पूजन केले बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबा बद्दल आपले मनोगते व्यक्त केली विद्यार्थिनींनी आजीची भूमिका साकारली होती. विद्यालयाचे शिक्षक श्री भाऊसाहेब करपे सर यांनी आपल्या जीवनातील आजी-आजोबा यांचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देसवंडी गावच्या उपसरपंच सौ मंगल ताई पवार या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या उपक्रमाचे कौतुक केले. आजी आजोबा दिनाची औचित्य साधून विद्यालयात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आजी व आजोबांसाठी संगीत खुर्ची व संगीत पासिंग बॉल या मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्या आजी आजोबांनी आज मनमुक्त पुणे आपल्या नातवावर असणारे प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले. संगीत खुर्चीत विजय झालेल्या स्पर्धकांना विद्यालयाकडून बक्षीसे देण्यात आली.

 कार्यक्रमास

संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगल ताई पवार, युवराज पवार ज्योतीताई शेळके, यांची उपस्थिती लाभली. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता तारडे व आभार रोहिणी भाकरे यांनी केले. 

या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.