नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एक दिवसीय दोन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न,विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.

नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एक दिवसीय दोन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न,विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

 

              महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत मॉडेल जिनोम क्लब व औषधी व सुगंधी प्रकल्प व सुपारी व मसाला विकास विकास निर्देशालय कालीकत केरळ व यांच्या संयुक्त विद्यमाने व राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील साहेब व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील ढेकळे व शिंगाशी या गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय दोन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले

 

             या कार्यक्रमानिमित्त विद्यापीठाच्या कृषी वनस्पती शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीबद्दल व मानवी जीवनात विविध आजारांवर वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे उपयोग व महत्व तसेच दुर्मिळ वाणांचे जतन करणे याबद्दलची माहिती डॉ. विजू अमोलिक, व डॉ.विक्रम जांभळे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली. तसेच डॉ.दिलीप ठाकरे यांनी बीजोत्पादन व पिक लागवडीनंतर योग्यवेळी खते व औषधे यांची निवडयाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी वनस्पतीशास्र विभागाचे प्रमुख डॉ.विजू अमोलिक हे होते तर या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती औषधी व सुंगधी वनस्पती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ.विक्रम जांभळे व बियाणे विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.दिलीप ठाकरे व स्थानिक गावातील सरपंच नामदेव भोये, राजेंद्र पवार उपसरपंच, सरपंच प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य परबत चव्हाण, नंदू चौधरी, अशोक राऊत, भाऊराव भोये, तुळशीराम गायकवाड, यांच्या सह गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना औषधी सुगंधी वनस्पती प्रकल्पातर्फे स्नेह भोजन व ट्रेनिंग किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल निमसे, अतुल डाडर, अमोल संसारे, शेखर भुजाडी अक्षय ठेपले, पृथ्वीराज सूर्यवंशी, रावजी पठारे यांचे सहकार्य लाभले.