शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती साठी अर्ज २६८ विक्रमी अर्ज. शेवगाव चे माजी सरपंच श्री सतीश माधव लांडे पाटील यांचा अर्ज मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल.
शेवगांव कृषी उत्पन्न बाजार समिती साठी अर्ज 268 विक्रमी अर्ज शेवगांव चे माजी सरपंच श्री.सतीश माधवराव लांडे पाटील यांचा अर्ज मान्यवरांच्या उपस्थित दाखल
शेवगांव - यशवंत पाटेकर
शेवगांव तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १८ जांगासाठी एकूण तब्बल २६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता . त्यामुळे सहाय्यक निबंधक कार्यालयास यात्रेचे स्वरूप आले . आज शेवटच्या दिवशी १९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले . अनेकांनी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले . आज माजी सरपंच श्री. सतीश माधवराव लांडे पाटील यांचा सोसायटी मतदार संघातुन अर्ज दाखल करतांना वसंतराव लांडे गुरुजी इमाजी उप सरपंच शेवगांव जाजभाई काझी भारदे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हरीश भारदे माजी उप नगराध्यक्ष वजिरभाई पठाण माजी नगरसेवक कैलास तीजोरे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शितरे तात्यासाहेब लांडे प्रताप फडके माजी उपसरपंच राहुल मगरे अप्पासाहेब मगर अरुण श्रीपती लांडे सुनील डाके राजेंद्र इंगले राजेंद्र मगर दत्तात्रय आरे विक्रम मगर राजेंद्र साखरे गणेश साळवे सतीश बोरुडे अशोक फुंदे सुरेश लांडे अशोक बडधे ईश्वर मगर संदीप पंडित सुहास मगर यांच्यासह अनेक कार्यकार्ये उपस्थित होतें मतदार संघ निहाय दाखल झालेल्या उमेदवारी अर्जंची संख्या पुढील प्रमाणे –
सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण ७ जागा १११ अर्ज महिला राखीव २ जागा १९अर्ज ,इतर मागासवर्गीय १ जागा २२अर्ज,विमुक्त जाती –भटक्या जमाती १ जागा १४ अर्ज ,ग्राम पंचायत मतदार संघ सर्वसाधारण २ जागा ५८ अर्ज ,अनुसूचीत जाती जमाती १ जागा १४ अर्ज,दुर्बल घटक १ जागा ८ अर्ज ,व्यापारी आडते मतदार संघ २जागा १३ अर्ज ,हमाल मापाडी मतदार संघ १ जागा ९अर्ज . असे एकूण 268 अर्ज दाखल झाले आहेत .
बुधवारी (दि५ ) रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून गुरुवार दि . २० एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे .
अर्ज मागे घेण्यासाठी 14 दिवस असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था नागरपरिषद जिल्हापरिहद पंचायत समिती ग्रामपंचायत साठी नेतृत्वा कडुन शब्द घेणे असे कार्यक्रम होऊ शकतात यंदा सभासद सोडुन शेतकरी सुद्धा फॉर्म भरू शकत होतें त्यामुळे विक्रमी अर्ज आले अर्ज मागे घेण्याचा प्रक्रिया झाल्या नंतर चित्र स्पष्ट होईल राष्ट्रवादी भा.ज.पा. जनशक्ती मंच अशी तीनरानगी लढत होण्याची शक्यता आहे.
शेवगाव पत्रकार - यशवंत पाटेकर