वळण येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याचे किर्तन देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या किर्तनाने संपन्न .
आज वळण येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने दत्त संस्थान देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.
काल्याचे किर्तन म्हटले की भगवान बालकृष्णांच्या बाललीला व त्याचे वर्णन कीर्तनामध्ये असते. अगदी त्याचप्रमाणे महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांनी भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळांमधील बाल लीलांचे वर्णन आपल्या कीर्तनातून केले.
कीर्तनातील भक्तिमय वातावरणामुळे पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले होते.
याप्रसंगी गुरुवर्य बाबाजीं बद्दल सांगताना उत्तराधिकारी प्रकाश नंदगिरी महाराज म्हणाले की सर्वसामान्य भक्त महाराज लोकांना आदर्श मानतात गुरु मानतात.
परंतु महाराज लोक ज्यांना आदर्श आणि गुरु मानतात असे असणारे गुरुवर्य बाबाजी म्हणजे महंत भास्करगिरी महाराज आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून एकाही आमदार खासदार पुढारी यांना राम जन्मभूमी उद्घाटन प्रसंगी निमंत्रण नव्हते, परंतु साक्षात राम लल्लांनी गुरुवर्य बाबाजींना निमंत्रण दिले. या उद्घाटन प्रसंगी बाबाजींना संपूर्ण महाराष्ट्रातून निमंत्रण होते ही मोठी गौरवास्पद बाब आहे.
जगाचा मालक पांडुरंग परमात्मा पंढरी ष भगवान विठुरायांनी ज्यांना पंढरपूरकडे लक्ष देण्यासाठी विश्वस्त मंडळाचे व अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची बुद्धी दिलीअसे गुरुवर्य बाबाजी आहेत अशा शब्दात गुरु महिमा वर्णन केली.
याप्रसंगी पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली व या कीर्तन सेवेचा लाभ घेतला.
वळण येथील सप्ताहास 48 वर्ष म्हणजे तीन पूर्ण झालेले आहेत हा उल्लेख गुरुवर्य प्रकाश नंदगिरी जी महाराज यांनी विशेषत्वाने केला व गावाच्या अद्वितीय कार्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले.
भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घराघरावर तिरंगा लावण्याचे आवाहन गुरुवर्य प्रकाश नंदगिरी महाराज यांनी जमलेल्या सर्व भाविकांना आवाहन केले.
आज जवान देशाचे सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण सर्व गुण्यागोविंदाने मनमोकळ्या वातावरणात मुक्त संचार करीत असतो ही कृपा फक्त सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची आहे. अशा शब्दात देशाबद्दल गौरव उद्गार त्यांनी व्य
क्त केले.