वंचितच्या मोर्चातील महिलेच्या मदतीला आरएसएसचे रुग्णालय!
वंचितच्या मोर्चातील महिलेच्या मदतीला आरएसएसचे रुग्णालय!
संभाजीनगर प्रतिनिधी : प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.
छत्रपती संभाजीनगर येथे “RSS बॅन करा” या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी #जन_आक्रोश_मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान एका महिलेला अचानक भोवळ आल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली.
तत्काळ उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जवळच असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयात (जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे) उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी विलंब न लावता महिलेला आवश्यक प्राथमिक उपचार दिले आणि तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.
या घटनेने उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला - “RSS ला बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या मोर्चातील महिलेच्या मदतीला आरएसएसशी निगडित रुग्णालय धावून आले!”
यावेळी उपस्थित असलेल्या एका RSS कार्यकर्त्याला विचारण्यात आले की, “तुमच्या विरोधात मोर्चा निघाला असताना तुम्ही कोणताही भेदभाव न करता एवढ्या जलदगतीने मदतीला कसे पोहोचलात?” त्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिले –
> “त्यांच्या मनात आमच्याबद्दल राजकीय स्वार्थ किंवा काही काही गैरसमज असू शकतात, आज ना उद्या गैरसमज दूर होतील, परंतु आम्ही आंबेडकरवादी समाजाला आमचे बांधव मानतो. कोणत्याही मतभेदांपेक्षा माणुसकी मोठी आहे, आणि आमच्या सर्व बांधवांच्या मदतीला आम्ही सदैव तत्पर असतो.”
ही घटना केवळ मानवी सेवेचे उदाहरण ठरली नसून, भिन्न विचारसरणी असूनही मानवतेच्या पातळीवर एकत्र येण्याचे दर्शन घडवणारी ठरली आहे. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली...








