*विश्रांतवाडीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची राहुरी पोलिसांकडून 4 दिवसांत सुटका; आरोपी वडनेरमधून ताब्यात*

*विश्रांतवाडीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची राहुरी पोलिसांकडून 4 दिवसांत सुटका; आरोपी वडनेरमधून ताब्यात*

*राहुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; विश्रांतवाडीतून अपहरण झालेल्या 17 वर्षीय मुलीची वडनेर येथून सुटका, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 110 मुली पालकांच्या स्वाधीन*

*विश्रांतवाडीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची राहुरी पोलिसांकडून 4 दिवसांत सुटका; आरोपी वडनेरमधून ताब्यात*

*राहुरी, दि. 25 मे 2026*: पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून 21 मे रोजी अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची राहुरी पोलिसांनी वडनेर येथून सुखरूप सुटका केली. 'ऑपरेशन मुस्कान' मोहिमेअंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 110 मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे.

दि. 21 मे 2026 रोजी दुपारी विश्रांतवाडी येथून सदर मुलगी राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. पालकांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 249/2026, BNS कलम 137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याबाबत विश्रांतवाडीचे पो. उपनिरीक्षक विशाल माने यांनी राहुरीचे पो. निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती दिली. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विकी शिवाजी अमोलिक, वय 30, रा. बेलापूर ता. श्रीरामपूर, सध्या रा. वडनेर ता. राहुरी हा अल्पवयीन मुलीसोबत वडनेर गावात असल्याचे समजले.

पो. निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. अंमलदार प्रमोद ढाकणे व उमेश शेख यांनी कनगर पोलीस पाटील मुसमाडे यांच्या मदतीने वडनेर येथील एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. तेथे आरोपी विकी अमोलिक याच्या ताब्यात अपहृत मुलगी मिळून आली. मुलीची सुटका करून तिला व आरोपीला राहुरी पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पुढील कारवाईसाठी दोघांनाही विश्रांतवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोकॉ प्रमोद ढाकणे, उमेश शेख, सतिष कुऱ्हाडे, नदीम शेख, पो हे कॉ सचिन धनाड, दरेकर, पो ना वेताळ यांच्या पथकाने केली.