विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करा,राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटनेच्या वतीने गटशिक्षण अधिकारी यांना दिले निवेदन .
शुल्लक कारणावरुन ७ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांनी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालूक्यातील कोळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक संजय कपिलेश्वर वायळ यांनी ७ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेला ओम विजय पाचारणे या विद्यार्थ्यांला दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी फक्त हसत असलेल्या कारणाने बेदम मारहाण केली. डोक्यावर टेंगूळ व अंगावरून वळ येई पर्यंत विद्यार्थ्यांला मारहाण केली. अगदी लहान मूलांना शोभेल असे कृत्य एका जबाबदार मुख्याध्यापकाने केले. हे कृत्य अशोभनीय व निंदनीय आहे.
सदर शिक्षकावर आर टि आय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अन्यथा कोणत्याही क्षणी कुठलीही कल्पना न देता राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या संघटनेच्या वतीने शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनात दिला आहे.