कृषीदुतांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक अॅपचे केले मार्गदर्शन .
कृषीदूतांतर्फे शेतकऱ्यांना शेतीविषयक ॲपचे मार्गदर्शन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, विळद घाट येथील कृषीदूत मोटे रामचंद्र, काळे सुरज, मगर ऋषिकेश, कदम सचिन, काळे जीशांत यांनी राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द गावात सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विविध शैली अँपच्या माध्यमातून कसे ओळखायचे व त्यावरील औषधाची फवारणी योग्य पध्दतीने कशी करावी (प्लॅन्टीक्स, शेतकरी मित्र, कृषिदर्शनी , बिघात ॲप, एक्यूवेदर ॲप ,डॉक्टर किसान, शेतकरी बाणा ) अशा ॲपविषयी माहिती दिली.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक आणि सेंद्रिय शेतीचे व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय, हवामान अंदाज, मातीपरीक्षण याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरसन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एम. बी. धोंडे , उपप्राचार्य डॉ.एस. बी. राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. के .एस. दांगडे, प्रा.भोसले सर, प्रा.खेडेकर सर , प्रा. गायकवाड सर , प्रा. ठोंबरे मॅडम यांच्यासह इतर शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले . यावेळी कृषीदुत व शेतकरी उपस्थित होते .