तेलकुडगाव जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब घोडेचोर तर उपाध्यक्षपदी दिनेश म्हस्के.

तेलकुडगाव जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब घोडेचोर तर उपाध्यक्षपदी दिनेश म्हस्के.

बालाजी देडगाव:-

( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शाळेची पालक सभा पार पडली असून त्या सभेमध्ये पालकांच्या सर्वानुमते नूतन अण्णासाहेब दामोदर घोडेचोर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दिनेश बाबासाहेब म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  

          यावेळी नूतन सदस्य म्हणून , विलास अशोक घाडगे, दत्तात्रय अशोक घोडेचोर , ,संदीप छानदेव घोडेचोर, अंबिका सुखदेव माळी ज्योती योगेश उनवणे, शिवकन्या अशोक काळे ,दिव्यांग प्रतिनिधी गंगा रामनाथ काळे, अपूर्वा नामदेव शेंडगे , राजेंद्र लक्ष्मण साळवे शिक्षक प्रतिनिधी संभाजी परशुराम कडू , शिक्षण प्रेमी आदर्श शिक्षक दत्तात्रय गुंजाळ, ग्रामपंचायत प्रतिनिधी महेश दत्तात्रय गटकळ,विद्यार्थी प्रतिनिधी हर्षवर्धन सुनील *राजहंस* ., पालक प्रतिनिधी उज्वला रवींद्र काळे व सचिव ज्ञानदेव लक्ष्मण सावंत यांची नूतन सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यांना नेतृत्व अभिजीत घोडेचोर युवराज काळे सचिन गंगाधर काळे दत्तात्रय साहेबराव काळे यांनी केले

       यावेळी मुख्याध्यापक सावंत सर लोणारे सर ,लोंढे सर, शेंडगे सर ,तावरे मॅडम यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले.

        यावेळी विविध संघटनेच्या , विविध सहकारी सेवा सोसायटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सन्मान सहकार सभागृहात करण्यात आला.

         यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र पाटील म्हस्के, सोसायटीचे चेअरमन काकासाहेब बाजीराव काळे, व्हाईचेअरमन आदेिकाताई काकासाहेब घोडेचोर, माझी पंचायत समिती सदस्य गोरक्षनाथ घोडेचोर व सेवा संस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

         या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्यांचा परिसरातून अभिनंदन होत आहे.