हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंब पिकावरील मावा किड व्यवस्थापानासाठी भेटी व मार्गदर्शन*

हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंब पिकावरील मावा किड व्यवस्थापानासाठी भेटी व मार्गदर्शन*

हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंब पिकावरील मावा किड व्यवस्थापानासाठी भेटी व मार्गदर्शन*

मौजे कोल्हार बुद्रुक, निर्मळ पिंपरी ता. राहुरी जिल्हा. अहिल्यानगर येथे हॉर्टसप अंतर्गत डाळिंब या पिकांची पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले व घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले. या भेटी दरम्यान राहुरी विद्यापीठातील डॉ. प्रवीण खैरे, हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी, कृषी विभागाच्या श्रीमती मीना जाधव (सहायक कृषी अधिकारी, कोल्हार बुद्रुक), जया निमसे (सहायक कृषी अधिकारी, पिंपरी निर्मळ), हे उपस्थित होते. या भेटीसाठी डॉ. रवींद्र गायकवाड (हॉर्टसॅप प्रकल्प प्रमुख तथा विभाग प्रमुख), डॉ संजय कोळसे (हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक), डॉ . प्रकाश मोरे (रोग शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके संशोधन प्रकल्प) वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मार्गदर्शन लाभले.

*मावा किड व्यवस्थापन*

नुकसान: पाने पिवळे पडतात, फांद्या कोमेजतात. ही किड चिकट पदार्थ स्रावते ज्यामुळे पानांवर सुटी मोल्ड (काळी बुरशी) ची वाढ होते. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. कोवळ्या पालवीवर या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. यामुळे वाढ खुंटते, फळगळ होते, फळांचा दर्जा घसरतो व उत्पादनात घट येते.

*उपाययोजना*

• किडग्रस्त पाने व फांद्या गोळा करून नष्ट करा. 

• योग्य छाटणी करून बागेत हवा खेळती ठेवा.

• एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.

• अधिक प्रादुर्भाव असल्यास सायंट्रानिलिप्रोल १०.२६% ओ.डी ०.९ मि.ली. प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारावे.

राहुरी तालुका प्रतिनिधी  - डॉ देवेंद्र शिंदे