महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात 5 अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त*
*सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच विद्यापीठाचे नाव मोठे होत असते*
*- कुलसचिव श्री. अरुण आनंदकर*
*राहुरी विद्यापीठ, दि. 30 सप्टेंबर, 2024*
शासकीय सेवेमध्ये काम करताना व्यक्ती कोणत्याही पदावर असेल, अशावेळी ती व्यक्ती तिचे काम कशा पद्धतीने करत आहे याला फार महत्त्व असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा हा सर्वात महत्त्वाचा गुण होय. यामुळेच आपण केलेले काम इतरांसाठी मार्गदर्शक ठरून ते काम करत असलेली संस्था सुद्धा उच्च पदाला पोहोचते. विद्यापीठात काम करणारा मजूर असेल किंवा इतर कर्मचारी, अधिकारी असेल या सर्वांच्या एकत्रित कामामुळेच विद्यापीठाचे नाव मोठे होत असते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव श्री.अरुण आनंदकर यांनी केले. यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार व सेवानिवृत्त विषयक लाभ देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना श्री. अरुण आनंदकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व अधिष्ठाता कार्यालयाचे डॉ. रवींद्र आंधळे उपस्थित होते.
यावेळी श्री. अरुण आनंदकर पुढे म्हणाले की सेवानिवृत्तीच्या दिवशी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ मिळणे हे प्रशासनाचे फार महत्त्वाचे काम असून यामुळे या कर्मचाऱ्यांना विद्यापीठांमध्ये वारंवार यावे लागत नाही. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यापीठाचा सर्वात महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे मजूर होय. त्यांनी केलेल्या अपार कष्टातूनच हे विद्यापीठ मोठे झालेले दिसते. या मजूर वर्गाबरोबरच इतर कर्मचारी, अधिकारी व शास्त्रज्ञ यांनीही आपले काम चोखपणे करून या विद्यापीठाचे नाव मोठे केले आहे. डॉ. गोरक्ष ससाणे यावेळी म्हणाले की निवृत्ती ही शासकीय सेवेमध्ये ठरलेली असते. नोकरीमध्ये आपण कशा पद्धतीने सेवा केली यावर आपले सुख, समाधान अवलंबून असते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राहुरी, कोल्हापूर व पुणे या तीन विभागातील 5 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के व श्री. अरुण आनंदकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणारे डॉ. सोमनाथ धोंडे, श्री. संजय दुबे व श्री. विश्वनाथ दळे या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांच्या कार्यतत्पतेमुळे सेवानिवृत्त होणार्या या अधिकारी व कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दिलीप दुधाडे, डॉ. दिलीप देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सोमनाथ धोंडे यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय रुपनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, सहाय्यक कुलसचिव (प्रशासन) श्री. सागर पेंडभाजे , श्री. बाळासाहेब पाटील, श्रीमती शैला पटेकर व श्रीमती शिल्पा चतारे यांनी अथक परिश्रम घेतले.