कृषी मंत्री साहेब ज्याच्या ताटात भरपुर त्यालाच वाढा खिर पुरी प्रकल्प ग्रस्तांना मात्र उपासमारी.

कृषी मंत्री साहेब ज्याच्या ताटात भरपुर त्यालाच वाढा खिर पुरी प्रकल्प ग्रस्तांना मात्र उपासमारी.

महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा विषय मार्गी न लावताच विद्यापीठातील प्राध्यापक,विभागप्रमुख व सहयोगी अधिष्ठता,यांच्या पदोन्नती निवडी संबंधी बैठका घेऊन व त्यांचा विषय तातडीने मार्गी लावण्यात यावा अशी विनंती राज्याचे कृषी मंत्री साहेब धनंजयजी मुंडे साहेबांनी दि.२९ /जुलै/२०२४ रोजी केली,

परंतु कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब ज्या शेतकऱ्यांच्या जमिनि शासनाने घेऊन विद्यापीठाला कृषी संशोधन, शिक्षणा साठी दिल्या त्यांच्याच वारसाला आज प्रकल्पग्रस्त नोकरभरती साठी शासनाच्या दारात नोकरीची भिक मागायची वेळ आली आहे हि बाब अत्यंत गंभिर स्वरूपाची आहे याचा आपण नुसता विचार करून उपयोग नाही तर यावेळेस आपली कृती महत्वाची आहे

ज्यांच्या ताटात अगोदरच भरपूर वाढलेले आहे

त्यांचाच आगोदर विचार करून सध्या प्रकल्पग्रस्तांचे ताट रिकामे ठेऊन आपण त्यांचेवर अन्याय करताय

कृषी मंत्री साहेब प्रकल्पग्रस्तांच्या जमिनिमुळेच आज हे चारही विद्यापीठाचे वैभव आज आपल्याला दिसत आहे ज्या प्रयोजना साठी राहुरी कृषी विद्यापीठाला जमिनी सपादीत केल्या त्या प्रयोजना साठी सदर जमिनिचा वापर होत नाही प्रकल्पग्रस्तांना भुमिहीन करून ह्या जमिनी वळु सारख्य खाजगी प्रकल्पाला देण्यात आल्या तर ४०० एकरापेक्षा जास्त जमीनी सोलर पावर कंपनिना देण्याचे प्रयोजन केले व मुळ भुमिपुत्रांना देशोधडीला लावले 

विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊन त्यांना मंत्रालयाच्या फेऱ्या मारण्या ऐवजी विद्यापीठ स्तरावरच निर्णय घेऊन सेवेत कायमस्वरूपी

सामाऊन घेण्यासाठीचा शासन निर्णय काढावा यामुळे प्रकल्पग्रस्त कोणीही नोकरी वाचून वंचित रहाणार नाही

अशी तरतुद करावी किंवा आमच्या उपजिविकेसाठी सदर जमिनी आम्हाला संपादीत प्रमाणात परत करण्यात याव्यात अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.