भामाठाण येथील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल वर्षानुवर्ष अपूर्णावस्थेत
गोदावरी नदीवरील नागमठाण येथील पुलाचे बांधकाम अनेक वर्षापासून रखडले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र ला जोडणारा नागमठाण येथील हा पूल 13 वर्षापासून अपूर्ण अशा अवस्थेत आहे. संबंधित कार्यालयाला वेळोवेळी निवेदने देऊनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्या कारणाने नागरिकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काल 10 फेब्रुवारी रोजी नागरिकांनी येथे जलसमाधी घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांना स्थानिक नागरिकांनी रोखुन सदर अधिकाऱ्यांना पाचारण केले.
जेव्हा काम चालू झाले .त्यावेळेस या फुलाची किंमत होती दोन कोटी रुपये आता ती बारा कोटी रुपयाच्या आसपास झालेली आहे त्यामुळे शासकीय कर्मचारी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. असे स्थानिक नागरिकांकडून समजले आहे. शेती दळणवळण, शिक्षण अशा सर्वांगीण विकासासाठी स्वप्नवत बनलेला हा पूल लवकरात लवकर पूर्णत्वाला यावा अशी मागणी आता आक्रोशाच्या रूपाने जनतेतून येत आहे.