शेतकऱ्यांकडून पैसे मागत ऊस तोडकरत आहेत शेतकऱ्यांची पिळवणूक प्रकार ऑडिओ क्लिप मुळे उघडकीस.
अहमदनगर:- प्रतिनिधी
प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. उसाला तुरे येत आहे तरीपण ऊस तुटून जात नाही. तुरे आल्यामुळे ऊसाला पोकळी पडली वजन घटले आहे. या उलट ऊसतोडणी मजूर पण झालेली पिळवणूक ऐवजी शेतकरी चक्क्यात पिसला जात आहे
तांदुळनेर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील ऊस बागायतदार व विकास सेवा संस्थेचे चेअरमन इंजि.श्री रमेश पांडुरंग साबळे यांचेकडून ऊसतोड कामगारांनी एकरी पाच हजार रुपये ऊस तोडी साठी घेतले असून सुद्धा दररोज ट्रॅक्टर ड्रायव्हरला जेवणाचे(एन्ट्री) रोजचे दोनशे रुपये द्यावेत म्हणून फोन केला. पैसे दिले नाही तर शेतातील तोडलेला ऊस शेतामध्ये उन्हात वाळविण्यात येईल अशा प्रकारची धमकी देत आहे.