शिवांकुर पतसंस्थेला 2023 चा सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर .
*शिवांकुर पतसंस्थेला 2023 चा सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर* .
दिल्ली91 वृत्तांत .
राहुरी शहरातील शिवांकुर अर्बन को-आप क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेस अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचा स्थैर्यनिधी संघामार्फत दिला जाणारा *सहकार समृद्ध पुरस्कार* 2023 या वर्षाकरीता सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून जाहीर झाला.
सहकार क्षेत्रात बळकटी आणणार्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने यावर्षीचा पतसंस्था पुरस्कार 2023 साठी संस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार पतसंस्था पुरस्कारासाठी शिवांकूर अर्बन को-आप क्रेडिट सोसायटी निवड करण्यात आलेली आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच सहकार आयुक्त अनिल कवडे व बुलढाणा अर्बनचे चेअरमन राधेश्यामजी चांडक यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पवार म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या पारदर्शी कारभाराचे प्रतिक आहे. यामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब पवार, व्हा. चेअरमन नारायण निमसे, ज्येष्ठ संचालक भास्करराव पवार तसेच डॉ नरेंद्र इंगळे, डॉ किशोर पवार, किशोर शिरसाट, गणेश शेळके, सौ मंगलताई पवार, सौ मीनाक्षी औटी, बाळासाहेब बाचकर आदी संचालक, ठेविदार, दैनिक ठेव प्रतिनिधी, कर्जदार तसेच कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.
सहकार समृद्धी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे,अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर निधीचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे, वसंतलाल लोढा, प्रकाश पारख, बाळासाहेब ऊंडे,शिवाप्पा कपाळे, कडू भाऊ काळे आदींनी अभिनंदन केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी देखील अभिनंदन केले आहे.