शैक्षणिक जबाबदारी उचलत मराठा संस्थाने जपली सामाजिक बांधिलकी .

*शैक्षणिक जबाबदारी उचलत मराठा संस्थाने जपली सामाजिक बांधिलकी*
राहुरी येथील मराठा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयातील चार विद्यार्थिनीचा चालू वर्षाचा शैक्षणिक खर्च महाविद्यालयातील प्रतिनिधी यांच्याकडे खजिनदार संदीप गाडे,मुख्य समन्वयक सतीश घुले यांनी धनादेश जमा केला.
राहुरी महाविद्यालयातील श्री.अमोल गायकवाड सर यांनी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांना संपर्क साधत महाविद्यालयातील हुशार चार विद्यार्थिनी आर्थिक अडचणी मूळे शिक्षणा पासून वंचित राहू शकतात असे कळविले.यापूर्वी देखील मराठा संस्थेने राहुरी महाविद्यालयातील आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भरलेली आहे.आपल्या मराठा संस्थेने मदत केल्यास विद्यार्थिनींचे शिक्षण थांबणार नाही अशी अशी माहिती श्री.गायकवाड सर यांनी सांगितले . चारही विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक अहवाल पहात मराठा संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ शैक्षिक खर्च भरण्यासठी सहमती दर्शवली.
मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुक्यासह परिसरात शैक्षणिक,वैद्यकीय इतरही येणाऱ्या सर्व समाज उपयोगी कार्यासाठी मदत करत असते तसेच सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी मराठा एकीकरण समिती व जिजाऊंच्या लेकी समूहाच्या वतीने अनेक उपक्रम राबवत असते.
या सर्व कार्यक्रमासाठी मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, उपाध्यक्ष राजेंद्र लबडे,संचालक संदीप गाडे,विनायक बाठे,कुलदीप नवले,अविनाश क्षिरसागर,मराठा एकीकरण समितीचे समन्वयक सतीश घुले, मच्छिंद्र गुंड,अशोक कदम,रोहित नालकर,अविनाश पवार, अण्णासाहेब तोडमल,विजय मोटे,सुभाष पवार,सागर ताकटे,ज्ञानेश्वर सप्रे, विक्रांत कडू,प्रशांत मुसमाडे,ईश्वर गाढे,बलराज पाटील,अशोक तनपुरे,योगेश तनपुरे,अनिरुद्ध मोरे,शिवाजी तनपुरे,महेंद्र शेळके,धनंजय नरवडे,दादासाहेब पवार,ज्ञानेश्वर टेकाळे,संभाजी निमसे, सतिष ढोकणे,मुकुंद निमसे, सतिष चोथे आदी परिश्रम घेत असतात.