शासन आपल्या दारी उपक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सहभाग .
*शासन आपल्या दारी उपक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सहभाग*
*राहुरी विद्यापीठ, दि. 18 ऑगस्ट,2023*
शिर्डी येथील विमानतळाजवळील काकडी येथे शासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री श्री. दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील लाभार्थ्यांसाठी विविध विभागांची दालने असलेले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान दाखविण्यासाठी विद्यापीठाचे दालन उभे केले होते.
या दालनाचे उद्घाटन खा. श्री. सदाशीव लोखंडे यांचे हस्ते करण्यात आले. या दालनात ड्रोन तंत्रज्ञान, कडधान्य, तृणधान्य यासह विविध फळांचे नमुने, सुगंधी व औषधी वनस्पती, विविध फळांचे वाण दालनात ठेवण्यात आले होते. यावेळी विविध तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, प्रा. डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. पंडित खर्डे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. अन्सार अत्तार, डॉ. संदिप लांडगे व डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते. या विद्यापीठाच्या दालनाला शेतकर्यांचा व लाभार्थ्यांचा प्रचंड प्रतीसाद मिळाला. या दालनाला 5 हजार पेक्षा जास्त शेतकरी व लाभाथ्यार्ंनी भेट दिली व तंत्रज्ञान जाणुन घेतले.