क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संगमनेर शहरामध्ये मोठ्या उत्सहात साजरी.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती संगमनेर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली - अज्ञान जातिभेद आणि अन्याय अंधकारकाराला छेद देणारे तेजस्वी सूर्य म्हणजेच क्रांतीसुर्य महात्मा
ज्योतिराव फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त संगमनेर शहर मध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित अभंग यांच्या हस्ते पुतळ्याला हार घालून शोभायात्रेला सुरुवात झाली .
या शोभायात्रेमध्ये सांप्रदायिक पंथाचे संदीप महाराज सावंत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांप्रदायिक पंतांचे दर्शन घडविले .तसेच वैजनाथ परळी येथील संबळ बँड या युवा कलाकारांनी संभळ वाजून आपली कला सादर केली .
तसेच युवतीने विविध वेधभूषा करून आपली कला सादर केली .तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई यांच्या पुतळ्यातला रोषणाई करून मिरवणुकीला मोठी शोभा आली .