मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रम काढा: अन्यथा रास्ता रोको..

मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रम काढा: अन्यथा रास्ता रोको..

मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रम काढा: अन्यथा रास्ता रोको..

इंदापूर प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_ इंदापूर येथील विरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळ व गढी वर गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट समूहाने अनधिकृत अतिक्रमण केले आहे, ते अतिक्रण शासनाने काढावे या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने, इंदापूर येथे दिनांक - २४/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता. रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन सर्वच प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नेमकी काय मागणी करण्यात आली आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.

         हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक गढ़ी व समाधी सण १६०६ मधे इंदापूर येथे युद्ध होऊन विरश्री मालोजीराजे भोसले यांना विरमरण आले आहे.

सध्या इतिहासाची साक्षीदार असलेली पुरातन गढी व समाधी इंदापूर येथे आहे, या ऐतिहासिक गढिच्या जीर्णोद्धार साठी सरकारने निधी दिला आहे. विरश्री मालोजीराजेच्या इतिहास जपण्यासाठी गढी चे संवर्धन व संशोधन होणे गरजेचं आहे. सध्याच्या गढीच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमन झाले आहे. व मालोजीराजे यांचे समाधीस्थळ उद्धस्त करून त्याजागी अतिक्रमण केले आहे.

खालील मागण्या न संदर्भात -

१) विरश्री सरदार मालोजीराने भोसले गढी, समाधीस्थळ व रामवेस येथील अतिक्रमण हटवण्यात यावे.

२) विरश्री मालोजीराजे गढ़ी वरील मोजणी करून हद्द पक्की करावी व हद जिथंपासून आहे तिथपसून (वॉल कपाउंड) संरक्षण भिंतीचे काम करावे.

३) हिंदू बहुजनांचा पीर दर्गा हा वक्फ बोर्ड कडे जमीन बेकायदेशिर दिली आहे. ती जमीन व दर्गा हिंदू बहुजनांकडे देण्यात यावा

४) पूर्वी विरश्री मालोजीराजे गढी चा उतारा नोंद होती, ती शोधून देण्यात यावी,

५) सदर गढी वरील कामाचे स्वरूपात बदल करण्यात यावा. सर्व शिवभक्तांना विश्वासात घेऊन ऐतिहासिक पद्धतीने काम असावे. सध्याच्या आराखड्या मधे बदल करावा.

६) विरश्री मालोजीराजे स्मारका व्यतिरिक्त गढी वर इतर धार्मियांचे कोणतेच धार्मिक स्थळ उभारु नये.

७) विरश्री मालोजीराजे यांची समाधीवरील अतिक्रमन काढून समाधीचा जीर्णोद्धार करण्यात यावा.

या मागण्यासाठी - सकल हिंदू समाज इंदापूर तालुका व सर्व शिवभक्त यांनी वेळो वेळी शासनाकडे मागणी केली व दोन वेळेस आमरण उपोषण केले. तसेच हिंदुत्ववादी आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
संबंधित प्रशासकीय अधिकारी फक्त आश्वासन देत आहे. व अतिक्रमण हटवण्यास व कारवाई करण्यास दिरंगाई करत आहेत.
प्रशासन सकल हिंदू समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असून अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपने उभा आहे. अशी चर्चा सकल हिंदू समाजामध्ये आहे.
प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आम्हाला न्याय मिळवण्यासाठी सकल हिंदू समाज व सर्व शिवभक्त इंदापूर तालुका गुरुवार दिनांक - २४/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गलांडवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.
सदरील आंदोलनासाठी हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप श्री. सागर बेग उपस्थित राहणार आहेत. आशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.