कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंब्याला मिळाला उच्चांकी दर .

*कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंब्याला मिळाला उच्चांकी दर*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागेतील फळांच्या विक्रासाठी महाटेंडर प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार फळझाडांची लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये यावर्षी रु. 71.00 लाख इतका उच्चांकी दर मिळाला आहे. सदर प्रक्षेत्रावरील आंबा बागेमध्ये 3071 इतकी उत्पादनक्षम झाडे असुन त्यामध्ये केशर, लंगडा, हापुस, वनराज, तोतापुरी, रत्ना, सिंधू, मल्लीका, दुधपेडा, निलम, आम्रपाली, पायरी इ. वाणांची फळझाडे आहेत. यामध्ये यंदा मागील वर्षाच्या तुलनेत आंबा फळापासुन मिळणार्या महसुलामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
विद्यापीठातील आंबा फळे ही चव व गुणवत्तेसाठी महाराष्ट्रात प्रसिदध आहेत. त्यामुळे विद्यापीठातील आंबा फळबागा घेण्यासाठी व्यापार्यांचा यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी हवामानाची मिळालेली साथ व संबंधीत विभागाने प्रक्षेत्रावरील आंबा फळबागांचे एकदाच आलेल्या मोहराचे केलेले सुयोग्य व्यवस्थापन या बाबी कारणीभुत ठरल्या आहेत. विद्यापीठातील आंबा बागांचे बारमाही व्यवस्थापन हे तांत्रीक व शास्त्रोक्त पदधतीने केले जाते. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि उद्यानविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. उद्यानविद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर यांच्या आंबाबागेच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे यावर्षी फळधारणा दुप्पट झाली असून मागील दहा वर्षाचा उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे.
उद्यानविद्या प्रक्षेत्रावरील आंबा फळबागांच्या महसुलामध्ये दरवर्षी वाढ होत असुन मागील चार वर्षात जवळपास त्यामध्ये चारपट वाढ झालेली आहे. यावर्षी विभागातील आंबा फळबागांच्या ई-लिलावाने उच्चांक गाठत सर्वोत्तम दर मिळवुन दिला. आंबा फळबागेचे वेळेत योग्य व्यवस्थापन तसेच अधिक उत्पादन वाढीसाठी उद्यानविद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर, तसेच त्यांचे सहकारी श्री. विजय पवार, श्री. राहुल पाटील, श्री. वसंत बाचकर, श्री. बाबासाहेब होडगर, श्री. सचिन शेळके, श्री. रमेश अनाप, श्री. पुंजाहरी बाचकर, श्री. दिपक पवार व उद्यानविद्या विभागाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.