' हिंगोली येथील अल्पवयीन मुलीस पळवून आणून अत्याचार केल्या प्रकरणी दोन आरोपींना १० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा , अँड मनिषा पी. केळगंद्रे
अहमदनगर : आरोपी नामे १. निलेश सुनिल उमाप , वय - ३४ वर्षे , आरोपी नं . २ माया रमेश आगलावे वय ४० वर्षे दोघे मुळ रा . इंदिरा नगर कळमनुरी जि . हिंगोली सद्या रा . शिवाजीनगर , निंबळक ता.जि. अहमदनगर यांनी हिंगोली येथून पिडीत अल्पवनीय मुलीस पळून आणून तिला खोली मध्ये डांबुन ठेवून तिला मारहाण तिच्यावर आरोपी नं . १ याने आरोपी नं . २ हिच्या मदतीने पिडीत मुलीवर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३६३ नुसार २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १,००० / - रुपये दंड , दंड न भरल्यास १ महिना साधी कैद , ३४२ नुसार १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ५०० / - रूपये दंड , दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैद , ३२३ नुसार ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा व ५०० / - रूपये दंड , दंड न भरल्यास १ आठवडयाची साधी कैद , ३७६ ( २ ) ( एन ) सह ३४ नुसार तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ३,४ नुसार एकत्रितपणे दोघा आरोपींना १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ३,००० / - रूपये दंड , दंड न भरल्यास २ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिचे सावत्र आई सोबत मौजे इंदीरा नगर कळमनुरी जि . हिंगोली येथील राहणारी आहे . तिचे सख्खे आई वडील हे लहान असतानाच वारले होते . सावत्र आई ही पिडीत मुलगी हिस सतत मारहाण व त्रास देत होती . आरोपी नं . २ माया आगलावे हिचे सोबत पिडीत मुलगी हिची जुन २०२० मध्ये ओळख झालेली होती . सावत्र आई सोबत पिडीत मुलींचे वाद झालेमुळे ती त्यांचे गावातील महादेवाच्या मंदीरात जावून बसलेली होती तेथे आरोपी नं . २ माया आगलावे हि आली व पिडीत मुलीस म्हणाली की , मी तुला तुझ्या आई कडे घेवून जाते व तुला मारू नको असे सांगते असे म्हणून आरोपी नं . २ हिने पिडीत मुलीला ब - याच गाडया बदलत अहमदनगरला घेवून आली . नगरला आल्यानंतर आरोपी नं . २ हिने पिडीत मुलीस आरोपी नं . १ निलेश उमाप याच्या मदतीने जबरदस्तीने त्याच्या मोटारसायकलवर बसवून एका खोलीवर घेवून गेले . तेथे गेल्यानंतर दोघा आरोपींनी पिडीत मुलीचे हातपाय बांधले व तिला मारहाण केली . तसेच तिला उपाशीपोटी ठेवून आरडा ओरडा करावयाचा नाही व चुपचाप बसायचे अशी धमकी दिली . त्यांनतर एके दिवशी आरोपी नं . २ माया हिने पिडीत मुलीची अंगावरचे कपडे काढले व आरोपी नं . १ याने पिडीत मुलीवर बळजबरी करून शारीरिक संबंध केले . त्यांनतर आरोपी नं . १ हा आरोपी नं . २ हिच्या मदतीने सतत पिडीत मुलीवर बळजबरी करत होता . त्यामुळे पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली . त्यामुळे आरोपी नं . १ निलेश व आरोपी नं . २ माया यांनी पिडीत मुलीस गोळ्या खायला देवून तिच्या पोटातील गर्भ पाडला . माहे ऑक्टोंबर २०२० मध्ये एके दिवशी आरोपी नं . १ निलेश हा पिडीत मुलीवर बळजबरीने शारिरीक अत्याचार करत असताना पिडीत मुलीने आरडा ओरडा केला . त्यामुळे तेथे राहत असलेल्या लोकांनी पिडीत मुलीचा आवाज ऐकून पिडीत मुलीची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली . पिडीत मुलीला एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात दिले . त्यानंतर पोलिसांनी बाल कल्याण समिती , अहमदनगर यांचेकडे मुलीचा ताबा दिला . पिडीत मुलीचा ताबा बाल कल्याण समितीकडे दिल्यानंतर सदर मुलीची चौकशी केल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये फ्रिडम फर्म संस्थेचे समन्वयक श्री . संदेश किसन जोगेराव यांनी एम . आय.डी.सी. पोलिस स्टेशन येथे हजर होवून आरोपींविरुध्द फिर्याद दाखल केली . एम.आय.डी.सी. पोलिसांनी आरोपी विरुध्द ३७६ ( २ ) ( एन ) सह ३४ व पोक्सो कायदा ४ व ६ नुसार गुन्हा दाखल केला . सदर गुन्हयाचा तपास तपासी अधिकारी पी.एस.आय. दिपक पाठक यांनी पूर्ण करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , फिर्यादी , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे १. निलेश सुनिल उमाप , वय - ३४ वर्षे , आरोपी नं . २ माया रमेश आगलावे वय ४० वर्षे दोघे मुळ रा . इंदिरा नगर कळमनुरी जि . हिंगोली सद्या रा . शिवाजीनगर , निंबळक ता . जि . अहमदनगर यांना मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ यांनी सहकार्य केले .
अहमदनगर ता . ०२/१२/२०२२
( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
विशेष सरकारी वकील , अहमदनगर .
मो . ९ ८५०८६०४११, ८२०८ ९९ ६७ ९ ५.