महाराष्ट्रातील जेजुरी, सातारा नंतर म.ल.हिवरा येथील नवसाला पावणारा खंडोबा ची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी.

महाराष्ट्रातील जेजुरी, सातारा नंतर म.ल.हिवरा येथील नवसाला पावणारा खंडोबा ची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी.

 अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथील नवसाला पावणारा खंडोबा रायची यांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सालाबाद प्रमाणे चंपाषष्ठी निमित्त या खंडोबा यात्रेचे आयोजन केले जाते या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

     या यात्रेची सुरुवात कार्तिक वैद्य त्रयोदशी पासून सुरुवात होऊन त्या दिवशी कावडीचे पाणी आणून मोठी मिरवणूक काढली जाते व मार्गशीर्ष प्रतिपदा या दिवशी खंडोबाला कपडे मोठा आरस केला जातो. व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करून पौराणिक असलेल्या पालखीचे मोठ्या थाटामाटात फटाक्याच्या आतषबाजी मध्ये मिरवणूक काढली जाते.

     यावर्षी यात्रेमध्ये विशेष बबनराव गवळी यांचे भारुड सादर करण्यात आले. व जिल्हा परिषद शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले .व सुप्रसिद्ध गायिका सौ कोमल ताई पाटोळे यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर लावणी सम्राट सुरेखा पुणेकर यांचाही लावणीचा कार्यक्रम घेण्यात आला व उषा नारायणगावकर यांचा लोकनाट्य लोकनाट्य तमाशा मंडळ यांचाही मोठा तमाशा उत्साहात पार पडला. यानंतर यात्रेची सांगता म्हणून जंगी हंगामा व हजरी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

     यावेळी देवस्थानचे नूतन अध्यक्ष अशोक केदार व देवस्थानचे पुजारी भारत क्षीरसागर यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हे देवस्थान पौराणिक व नवसाला पावणारे असून या देवस्थानला येणाऱ्या भाविकांची मनोकामना पुरी होते अशी आख्यायिका या यात्रेची आहे. जेजुरी सातारा यानंतर नेवासा तालुक्यातील मलहिवरा येथील खंडोबा नवसाला पावणारी तेजस्वी मूर्ती आहे .

       , राजकुमार पालवे, राजेंद्र गायके ,चेअरमन एकनाथराव जगताप ,संजय पाटील गायके ,नवनाथ गायके, रामचंद्र सांगळे, पोपट आव्हाड, भाऊसाहेब शेळके, आदिनाथ शिरसाठ गुरुजी ,उत्तम आव्हाड, ज्ञानेश्वर कदम

रावसाहेब गायके, देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त ,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन व सर्व संचालक व गावातील तरुण युवक विविध शाखा, संघटना , यात्रा कमेटी,यांनी मोलाचे सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले.