राहुरीतील एका पतसंस्थेने मांडला माहिती अधिकाराचा खेळ, पूर्ण पितळ उघड केल्याशिवाय माघार नाही - सचिन पवार .
प्रतिनिधी संभाजी शिंदे राहुरी
राहुरी तालुक्यातील एका पतसंस्थेने माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करून या कायद्याचा पूर्णपणे खेळ मांडला असल्याचे दिसून येत आहे . नुकत्याच झालेल्या जिजाऊ पतसंस्थेच्या घोटाळ्याने संपूर्ण राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे . आता दुसऱ्याही एका पतसंस्थेचा घोटाळा बाहेर येण्याचे चिन्ह स्पष्ट दिसू लागले आहे . माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेचे अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष श्री .सचिन वसंत पवार यांना राहुरीतील एका पतसंस्थेतील चालू असलेल्या घोटाळ्याविषयी माहिती मिळाली होती .याची खातर जमा करण्यासाठी सचिन पवार यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार या पतसंस्थेतून माहिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता .कालावधी उलटूनही पतसंस्थेने या अर्जाची दखल घेतली नाही .यावरून सचिन पवार यांना पतसंस्थेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत पूर्ण खात्री पटली .
या पतसंस्थेतून मागितलेली माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहुरी यांचेकडे अर्ज केला होता. सहाय्यक निबंधक यांनी पतसंस्थेस अर्जदारास माहिती देण्याचे सांगितले .या पतसंस्थेने अर्जदार व सहाय्यक निबंध यांना नोटीशेद्वारे उत्तर कळविले की पतसंस्थेत माहितीचा अधिकार चालत नाही तसेच आपण मागितलेली माहिती ही गुप्त असल्यामुळे पतसंस्था ही माहिती अर्जदारास देऊ शकत नाही असे उत्तर देऊन पतसंस्थेस असे खोटे अर्ज करू नये व असे अर्ज गुन्ह्यास पात्र आहे असे धमकीवजा लेखी पत्र देऊन कळविले आहे .
वरील दोन्हीही ठिकाणी न्याय न मिळाल्यामुळे सचिन पवार यांनी प्रथम अपील अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दाखल केला .प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अपील अर्ज मान्य करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहुरी यांना अर्जदारास पंधरा दिवसात माहिती उपलब्ध करून देण्यास सांगितले .परंतु जिल्हा उपनिबंधक यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवत अर्जदाराची निराशाच केली आहे .
वरिष्ठांचे आदेश असूनही माहिती देण्यास टाळाटाळ होत असेल तर किती मोठा झोल या पतसंस्थेत होत असेल यात शंकाच नाही .नुकत्याच झालेल्या अवैध शिक्षक भरतीत पतसंस्था चालकाचा हात असून काहि शिक्षकांना यात पतसंस्थेतून लाखो रुपयांचे कर्जही देऊन त्याच पैशावर त्यांना शिक्षक भरती घोटाळ्यात गाजलेल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून घेण्याचे काम या पतसंस्था चालकाने केल्याची चर्चा सुरु आहे . या पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा होणारा भ्रष्ठाचार हा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे अहमद नगर जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड व इतर पदाधिकारी यांचे याप्रकरणी पूर्ण लक्ष वेधून या सर्व प्रकरणांचा भांडाफोड करणार असल्याचे मत जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे .