राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय पत्रकार संघटनेने केला सन्मान .

राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय पत्रकार संघटनेने केला सन्मान .

             आज राहुरी तालुक्यातील पोलीस विभागामध्ये कार्यरत असणारे विद्यमान पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला .अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा गायकवाड, जिल्हा समन्वयक श्री सचिन पवार , जिल्हा मीडिया प्रभारी श्री आर .आर .जाधव यांनी श्री प्रताप दराडे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले .राहुरी तालुक्यातील समाजसेवक श्री . बाळासाहेब जाधव,पिंटू नाना साळवे, निलेश जगधने ,राहुरी पोलीस विभागातील सर्व अधिकारी,तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व तरुण युवक यांनी पुष्पहार अर्पण करून श्री .प्रताप दराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

   

        राहुरी तालुक्यातील पोलीस विभागामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री .प्रताप दराडे यांनी आपल्या कार्याने एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे .मध्यंतरीच्या काळामध्ये काही गावातील निर्माण झालेले गंभीर प्रश्न श्री . प्रताप दराडे यांनी योग्य रीतीने हाताळून एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याने नगर जिल्ह्यातील पोलिस विभागाची मान अभिमानाने उंचावली गेली आहे .

        तरुणांचे प्रेरणास्थान ठरलेले श्री .प्रताप दराडे हे राहुरी पोलीस विभाग व राहुरी तालुक्यासाठी मिळणे हे आमचे भाग्य आहे अशी उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती .यावेळी उपस्थितांशी बोलताना श्री प्रताप दराडे यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व पत्रकार , विविध संघटनेचे अधिकारी पदाधिकारी व तरुण युवकांनी मला हार व पुष्पगुच्छ रुपी शुभेच्छा देऊन जे प्रेम व्यक्त केले ते माझ्या पुढील कार्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील असे सांगितले .