खडी क्रेशर व्यावसायिकाच्या अंगावर बोलेरो घालून खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल.

खडी क्रेशर व्यावसायिकाच्या अंगावर बोलेरो घालून खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल.
नेवासा-शहरातील शंतनू पोपट वाघ रा. नेवासा अस गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंतनु वाघ यांचा खडका फाटा येथे खडी क्रेशर व्यवसायआहे. शंतनु वाघ नेवासा येथे राहत असून ते रोज मोटरसायकलने खडका येथे असलेल्या आपल्या स्वतःच्या खडी केशर व जातात व येतात.
शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास खडका येथे असलेल्या खडी क्रेशरवर जाण्यासाठी मोटर सायकलने निघाले होते. महिंद्रा बोलेरोने आपला कोणी तरी पाठलाग करीत असल्याचा दाट संशय आल्याने त्यांनी त्यांच्या बहिणीस फोन करून जवळच्या नातेवाईकांना कळविण्यासाठी सांगितले. काही मिनिटातच शंतनुच्या फोनवरून बहिणीला पुन्हा कॉल आला परंतु त्यावेळी शंतनू नाही तर दुसरी व्यक्ती समोरुन फोनवर बोलत होती आणि तुम्ही या व्यक्तीचे नातेवाईक आहात का ? याला एका महिंद्रा बोलेरोने उडवून पळून गेला असे सांगितले. शंतनुला प्रथम श्वास हॉस्पिटलमध्ये व नंतर संभाजीनगर येथे भरती केले आहे.
शंतनुचे नातेवाईक व मित्र यांनी अधिक माहिती घेतली असता घटनेच्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी एका पांढऱ्या रंगाची बोलेरो नेवासापासून त्रिमूर्ती कॉलेजपर्यंत पाठलाग करीत असल्याचे दिसुन आले.
शंतनु वाघ यांच्या जवळच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याने नात्यातीलच एका व्यक्तीने जुन्या रागातून सुपारी देऊन दुसऱ्या करवी सदरचा घात केला असल्याचा दाट संशय आल्याने शंतनूच्या बहिणीने पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दिल्याने खून करण्याचा प्रयत्न करणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून गुन्ह्यामध्ये वापरण्यात व शंतनुच्या अंगावर घालण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो व तिचा मालक आणि त्या मागील मुख्य सूत्रधार यांची ओळख पटलेली आहे असे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी सांगितले.
येत्या काही दिवसातच बोलेरोचा मालक व कटामगील मुख्य सूत्रधार हे कायद्याच्या कचाट्यात येतील असे सांगितले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे हे करीत आहेत.