उंबऱ्यातील घटनेबाबत महिलेसहित आठ जणांवर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल .

उंबऱ्यातील घटनेबाबत महिलेसहित आठ जणांवर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल .

                    सध्या राहुरी तालुका विविध मुद्द्यांवरून विधानभवनात गाजत आहे .राहुरी तालुक्यातील उंबरे गावात घडलेल्या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा हादरून  गेला आहे . लव जिहाद सारख्या गोष्टी बाहेर घडताना आपण ऐकत होतो परंतु आता मात्र गावागावात या घटना घडत असल्याचे चित्र समोर येत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे .उंबरे गावातील या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील आजी माजी आमदार यांनी या प्रकरणात गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे तसेच आरोपींना पाठीशी न घालता कडक कारवाईची मागणी ही केली आहे .

                  

                  तूम्ही खूप छान दिसता, माझे तूमच्यावर प्रेम आहे, तूमच्या शिवाय मी राहु शकत नाही. असे म्हणून अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. या घटने बाबत दोन महिलांसह आठ जणांवर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना जानेवारी २०२१ ते ऑक्टोंबर २०२१ या दरम्यान घडलीय.

                काय घडलयं उंबरे या गावात ?

               या घटनेतील आरोपी आवेज निसार शेख व कैफ शेख हे जानेवारी २०२१ ते ऑक्टोंबर २०२१ या दरम्यान एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करत होते. दरम्यान आरोपी आवेज शेख याने त्या अल्पवयीन मुली सोबत ओळख करून तिच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर तुम्ही खुप छान दिसता, माझे तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या शिवाय मी राहु शकत नाही. असे म्हणून त्या मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तीला वारंवार इन्साटाग्रामवर मेसेज करुन तुम्ही आमचे मुस्लिम धर्मात या, मुस्लिम धर्मात आल्यावर तुम्हाला आम्ही बुरखा घालायला देऊ. बुरखा घातल्यानंतर हिंदु मुले तुम्हाला त्रास देणार नाही व तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही. मुस्लिम धर्मात आल्यानंतर तुम्हाला बांगड्या, कुंकु, टिकली लावता येणार नाही. तुम्हाला मुस्लिम मुलीसारखे वागावे लागेल. असे सांगण्यात आले. 

          त्यानंतर आरोपी हिना शेख हिने त्या मुलीस सांगीतले कि, तुम्ही नेहमी हिंदी मध्ये बोलत जा. मुस्लीम मुला मुलींशी बोलत जा. त्याने मैत्री वाढेल. आता तुम्हाला इथुन पुढे आमच्या सारखे वागायचे आहे व रहायचे आहे. असे वारंवार बोलुन आवेश शेख याच्याशी बोलण्यास त्या मुलीला प्रवृत्त केले. तसेच आरोपी आलिशा शेख हिने त्या मुलीस फोन करून वेळोवेळी आरोपी आवेज शेख याच्या सोबत बोलणे करुन देऊन तीला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना गुन्हा करण्यास इतर आरोपींनी मदत केली.

         त्या अल्पवयीन मुलीने  दिनांक २८ जुलै २०२३ रोजी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी आवेज निसार शेख, कैफ शेख, सोहेल शेख, हिना शेख, आलिशा शेख, सलिम पठाण, अल्ताफ शेख, शाकिर सय्यद, सर्व रा. उंबरे, ता. राहुरी. या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. ८२२/२०२३ भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), १०९, ३४ बालकांचे लैगिक अपराधापासुन सरंक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहेत.