शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींची टोळी 9,26,000/ रु. किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई .

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींची टोळी 9,26,000/ रु. किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई .

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई .

 

 

            प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी नामे ऋषिकेश देविदास लगड वय 29 वर्षे, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांची त्यांचे घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000/- रुपये किमतीची पांढरी तुर ही दिनांक 27/12/2023 रोजी रात्री 10.00 ते दिनांक 18/12/2023 रोजी पहाटे 05.00 वा. चे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचा दरवाजा बाहेरुन लावुन चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. 692/2023 भादवि कलम 379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

 

              अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतमाल चोरीच्या घटना घडत असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ. भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ/संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

  

             स्थागुशा चे वरील पथक गुप्त बातमीदारामार्फत तसेच शेतमाल खरेदी करणारे व्यापारी यांचेकडे शेतमाल विक्री करीता येणारे संशयीत इसमांची माहिती घेत असतांना दिनांक 01/01/2024 रोजी पोनि/ दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी रा. जामगांव, ता. पारनेर याने व त्याचे साथीदाराने केला असल्याचे व ते आत्ता चोरी केलेली तुर व सोयाबीन असे टाटा कंपनीचे चार चाकी गाडीमधुन विक्रीकरीता पारनेर येथे येणार असलेबाबत माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पोलीस पथकाने तात्काळ जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचुन थांबले असता बातमीतील वर्णनाची टाटा कंपनीची इंट्रा गाडी येतांना दिसली.

 

               सदर गाडीवरील चालकास थांबवुन गाडीमध्ये असलेल्या मालाची पाहणी केली असता गाडीमध्ये तुर व सोयाबीन असल्याचे पथकास आढळुन आले. त्यावेळी गाडीमधील इसमांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे गाडीमधील मालाबाबत विचारपुस करता त्यांनी गाडीमधील तुर व सोयाबीन असे चोरी करुन आणलेले असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी वय 27 वर्षे, रा. पानमळा, जामगाव ता. पारनेर, जि. अहमदनगर 2) अमोल संतोष माळी, वय 24 वर्षे, रा. जामगाव ता. पारनेर, 3) रोहीत सुनिल शेळके, वय 19 वर्षे, रा. लोणी हवेली, ता. पारनेर, 4) आकाश अजिनाथ गोलवड, वय 25 वर्षे, रा. जामगाव ता. पारनेर, 5) विकास विठ्ठल घावटे, वय 20 वर्षे, रा. जामगाव ता. पारनेर, 6) संदीप उत्तम गोरे, वय 32 वर्षे, रा. जामगाव ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार 7) किरण संजय बर्डे, रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे, 8) साहील नामदेव माळी, रा. जामगाव ता. पारनेर यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

           ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामध्ये 96,000/- रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तुर, 30,000/- रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन व 8,00,000/- रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकुण 9,26,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. 692/2023 भादवि कलम 379, 342 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत. वरील आरोपी यांचेकडुन अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे.

 

            सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.