राहुरी तालुक्यावर महसुल प्रशासनास वाळू व मुरूम माफियांचे राज्य प्रस्थापित करायचे आहे का ? - देवेंद्र लांबे पा.
*शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या माफियांना आळा घाला – देवेंद्र लांबे पा.*
*राहुरी तालुक्यावर महसूल प्रशासनास वाळू व मुरूम माफियांचे राज्य प्रस्थापित करायचे आहे का ? – देवेंद्र लांबे पा.*
*तहसिलदार यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांचे धरणे आंदोलन*
–राहुरी तहसिल कचेरी येथे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा. यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैधपणे गौणखनिज संपत्ती चोरी होत असतांना महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ तहसिलदार नामदेव पाटील यांच्या दालनासमोर शिवसैनिकांनी धरणे आंदोलन करत महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
सोमवार दि.२३ रोजी राहुरी तहसिल कार्यालयात शिवसेना ता.प्र.देवेंद्र लांबे पा.यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांसह शेतकरी यांनी अचानक दाखल होत, राहुरी महसूल क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी गौणखनिज संपत्तीची लुट केली जात असल्याबाबत व महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा बाबत संताप व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना ता.प्रमुख देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि,राहुरी तालुक्यातील मुळा नदी व प्रवरा नदी मधून अनेक ठिकाणाहून अवैधपणे वाळू उपसा केला जात आहे.सदरील वाळू उपसा करतांना नदी काठच्या शेतकऱ्यांना वाळूतस्करांमुळे मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.राहुरी परिसरातील राहुरी कारखाना हद्दीतून मोठ्याप्रमानावर अवैध मुरूम उत्खनन करून चोरी झालेली आहे.सदरील मुरूम उत्खनन हे बा.बा.तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीत झाले आहे.राहुरी कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची सभासदांची मालमत्ता आहे; आणि मुरूम चोरी हि शेतकऱ्यांच्या मालमत्तेतून होत आहे.शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर मुरूम चोरी झालेली असल्यामुळे महसूल प्रशासनाने सबंधित ठिकाणावरचा तात्काळ पंचनामा करून कारवाई करावी.राहुरी तालुक्यातील गौणखनिज चोरीला तात्काळ आळा घालण्यात यावा.सबंधित गौणखनिज चोरांवर कारवाई करण्यात यावी.महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची मालमत्ता असलेल्या बा.बा.तनपुरे कारखाना हद्दीतील मुरूमावर डल्ला मारणाऱ्या माफियांवर आळा न घातल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे देवेंद्र लांबे पा.यांनी म्हंटले आहे.
या प्रसंगी सुभाष जुंदरे,रमेश सोनवणे,अशोक तनपुरे,रोहित नालकर,पै.सुनील खपके,अशोक साळुंके,प्रशांत खळेकर,विजय तोडमल,बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब जाधव,अमोल निमसे,अविनाश क्षिरसागर,मिलिंद हरिश्चंद्रेसुरेश तोडमल,बाप्पुसाहेब काळे,अनिल आढाव,निलेश गुंजाळ,दिपक जाधव,महेंद्र शेळके,अरुण जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
वेळोवेळी वर्तमान पत्रातून वाळू व मुरूम चोरी विषयात सातत्याने घटना समोर येत आहेत.महसूल प्रशासनाचे सबंधित माफियांशी आर्थिक हितसबंध असल्याचे बोलले जात आहे.थातूर मातुर कारवाई केल्याचे भासवले जात आहे.राहुरी तालुक्यावर महसूल प्रशासनास वाळू व मुरूम माफियांचे राज्य प्रस्थापित करायचे आहे का ? – देवेंद्र लांबे पा.*