उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी फाउंडेशनचे पुरस्कार विजेते श्री . चिमाजी बाचकर यांना पिंप्री अवघड पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी फाउंडेशनचे पुरस्कार विजेते श्री . चिमाजी बाचकर यांना पिंप्री अवघड पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा .

           

पिंप्री अवघड येथील रहिवासी तसेच रोग शास्त्रज्ञ अ.भा. स.भाजीपाला संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असणारे प्रा.चिमाजी भाऊसाहेब बाचकर यांचा पाणी फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .पाणी फाउंडेशनद्वारे 2022 च्या खरीप व रब्बी हंगामात आयोजित केलेल्या भाजीपाला डिजिटल शेती शाळा या उपक्रमात विषय तज्ञ म्हणून प्रा. चिमाजी बाचकर यांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अत्यंत समर्पक व तळमळीने उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले .

 

        सत्यमेव जयते फार्मर कप मधील शेतकरी गटांनी प्रा. चिमाजी बाचकर यांच्या मार्गदर्शनाने शास्त्रीय व पर्यावरण पूरक शेती पद्धतीचा अवलंब केला . त्यामुळे त्यांना शेतीतील रसायनांच्या वापरात घट,उत्पादन खर्चात घट, आणि उत्पादकतेत वाढ असे अनेक फायदे झाले.त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे शेतकरी गटांनी निसर्ग पूरक व कीफायतशिर शेतीकडे वाटचाल सुरू केली .शेतकरी गटांची शेती समृद्ध होण्यासाठी प्रा.चिमाजी बाचकर यांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल पाणी फाउंडेशन तर्फे हा सन्मान करण्यात आला आहे .

 

         फिल्म अभिनेते व पाणी फाउंडेशन चे संस्थापक अमिर खान यांच्या सत्यमेव जयते फार्मर कपमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्कार मिळाल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ व पिंप्री अवघड गावाचा मान प्रा . चिमाजी बाचकर यांनी नक्कीच वाढवला असल्याने पिंप्री अवघड गावातील तसेच पंचक्रोशितील नागरिक व शेतकरी यांनी त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत .