खाजगी पशुवैद्यकीय डिप्लोमा धारकांना कृत्रिम रेतन सेवा देण्यासाठी ओळखपत्र नूतनीकरण करून देण्याबाबत नामदार राधाकृष्ण विखे यांना दिले निवेदन.
प्रतिनिधी खेडले परमानंद सोनई
खाजगी पशुवैद्यकीय डिप्लोमा धारकांना कृत्रिम रेतन सेवा देण्यासाठी ओळखपत्र नूतनीकरण करून देण्या बाबत नामदार राधाकृष्ण विखे यांना दिले निवेदन .
: पंजाब राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मध्ये सिमेन अॅक्ट लागू करणे तसेच खाजगी कृत्रिम रेतन सेवा देणाऱ्या डिप्लोमा धारकांना प्रशासनामार्फत कृत्रिम रेतन सेवेसाठी ओळखपत्र नूतनीकरण करून देणे बाबत पशु चिकित्सक सेवादाता असोसिएशन ,महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत नामदार राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले आहे .
पशु चिकित्सक सेवादाता असोसिएशन,महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यालय सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर यांनी पंजाब राज्यांमध्ये ज्याप्रमाणे कृत्रिम रेतना संदर्भात सिमेन अॅक्ट लागू केलेला आहे , त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये तसा कायदा करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व नुकसान टाळावी तसेच जे खाजगी पशुवैद्यक कृत्रिम रेतन सेवा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवतात त्यांना सेवा देतेवेळी ओळखपत्र नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत .सन 2017 मध्ये जिल्हास्तरावर कृत्रिम रेतन सेवादात्यांना फक्त कृत्रिम रेतन सेवा देण्यासाठी ओळखपत्र वितरित केले होते त्याची मुदत सन 2020 साली संपली होती,त्या ओळखपत्राचे नूतनीकरण न झाल्यामुळे खाजगी डिप्लोमाधारक पशुवैद्यकांना काम करतेवेळी अनेक अडचणी येत आहेत.तरी जिल्हास्तरावरून योग्य त्या प्राधिकरणामार्फत खाजगी डिप्लोमा धारकांना ओळखपत्र प्रदान करण्यात यावे, जेणेकरून कृत्रिम रेतन कार्यामध्ये सुसूत्रीपणा येईल असेही या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देते प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष लांडे ,ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. नितीन पालवे उपाध्यक्ष डॉ. अनिल कोरडे , डॉ. राहुल काळे, डॉ. चंद्रकांत होन, डॉ. दत्तात्रय लोहकरे ,डॉ. भीमराज लांडे, व अभिजीत दरंदले उपस्थित होते.