नगर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबद. 6,30,000 / - रू .किमतीच्या मुद्देमालासह 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात .
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पो .नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना मोटार सायकल चोरी करणारे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पो .नि . दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ / मनोहर गोसावी, संदीप पवार, रविंद्र कडले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पोना/भिमराज खर्से, फुरकान शेख, पोकों/सागर ससाणे, रणजित जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड व चापोहेकॉ / संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथक नगर शहर परिसरात फिरून मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असताना दिनांक ३०/१०/२०२३ रोजी पोनि / श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे राहुल निकल रा. विळदघाट, ता. नगर हा साथीदारासह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली बिना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल विक्री करणे करीता येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलेले असताना दोन संशयीत इसम बिना नंबर लाल रंगाचे मोटार सायकलवर येताना दिसले.
पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) राहुल विजय निकम वय २४, रा. विळदघाट, ता. नगर मुळ रा. वडगांवगुप्ता, ता. नगर व २) बंडु सुदाम बर्डे वय २९, रा. देहरे, ता. नगर असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यातील मोटार सायकल व त्याचे कागदपत्रा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दुधडेअरी चौक, एमआयडीसी येथून सदर मोटार सायकल चोरी केली असुन विक्री करणे करीता आणली असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी साथीदार नामे ३) अरुण बाळासाहेब धिरोडे वय २५, रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर याचे सोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी, निंबळक येथुन ४ व पुणे जिल्ह्यातील शिरुर व आळेफाटा येथुन ३ अशा विविध ठिकाणाहुन एकुण ७ चोरी केलेल्या मोटार सायकल पैकी तिन मोटार सायकल या त्याचेकडे व तिन मोटार सायकल या साथीदार बंडु बर्डे व एक मोटार सायकल ही साथीदार अरुण धिरोडे याचेकडे असल्याचे सांगितले. पथकास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या ६ मोटार सायकल मिळुन आल्या व आरोपी नामे अरुण धिरोडे याचा बेलापुर ता. श्रीरामपूर परिसरात शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास चोरीची एक मोटार सायकलसह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन ६,३०,०००/- रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या ७ मोटार सायकल मिळुन आल्याने आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७/२०२४ भादविक ३७९ प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.