भागवत दीक्षित यांना नागेबाबा परिवाराचा बेस्ट गोल्ड व्हॅल्यूअर पुरस्कार प्रदान.

भागवत दीक्षित यांना नागेबाबा परिवाराचा बेस्ट गोल्ड व्हॅल्यूअर पुरस्कार प्रदान.

*भागवत दीक्षित यांना बेस्ट गोल्ड व्हॅल्यूअर पुरस्कार प्रदान.*

नेवासा (प्रतिनिधी युनूस पठाण) :- बालाजी देडगाव येथील सोने चांदीचे व्यापारी तथा उत्कृष्ट सोने पारखदार भागवत दीक्षित यांना आत्ताच नागेबाबा परिवाराच्या वतीने अहिल्यानगर येथे बेस्ट गोल्ड व्हॅल्यूअर पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान झाला.

विश्वविक्रम प्रस्थापित श्री .संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना जे उत्कृष्ट कामकाज करतात . त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून उत्कृष्ट सोने परीक्षन केल्याबद्दल श्री .संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेचे सोने परीक्षक श्री. भागवत दीक्षित यांना बेस्ट गोल्ड व्हॅल्यूअर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी देडगावचे सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,ह. भ. प. सुखदेव महाराज मुंगसे ,मा .उपसरपंच महादेव पुंड, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युनूस पठाण, संतोष तांबे, किशोर मुंगसे , सोसायटीचे व्हाईस चेअरमन जनार्दन मुंगसे, युवा नेते श्रीकांत हिवाळे ,संभाजी कुटे ,सदाशिव गोयकर ,पाराजी पुंड, भागिनाथ गोफने, आदींनी पुरस्कार बेस्ट गोल्ड व्हॅल्यूअर पुरस्कार मिळाल्याबद्दल भागवत दीक्षित यांचे अभिनंदन केले .व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     आलेल्या मान्यवराचे स्वागत व आभार शाखेचे अधिकारी पांडुरंग एडके यांनी मानले.