सुगंधी तंबाखु, पानमसाला विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणारे दोन आरोपी 8,13,927 रु . किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई .

महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करणारे 02 आरोपी 8,13,927/- रू. किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई .
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्या अनुषंगाने पो .नि .दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ अशांचे पथक तयार करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.
दिनांक 15/04/2025 रोजी पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना, पथकास गुप्तबातमीदारामार्फत इसम नामे दिपक नाना टकले व पंकज नाना टकले, रा.काष्टी, ता.श्रीगोंदा हे महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंध असलेली व शरिरास अपायकारक होईल असा पानमसाला व सुगंधीत तंबाखु त्यांचेकडील एमएच-16-सीक्यु-8673 या वाहनामधुन श्रीगोंदा येथुन काष्टीकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासह काष्टी ते श्रीगोंदा जाणारे रोडलगत दांगड लॉन्स परिसरामध्ये सापळा रचुन संशयीत वाहनाचा शोध घेऊन, संशयीत वाहनास थांबवून वाहनातील इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी 1) दिपक नाना टकले,वय 31, ü 2) पंकज नाना टकले, वय 28 दोन्ही रा.इंद्रप्रस्थ पार्क, काष्टी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.
पंचासमक्ष त्यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विमल, हिरा, आरएमडी कंपनीचा पानमसाला, विविध प्रकारची सुंगधीत तंबाखु मिळून आली.पथकाने आरोपीचे ताब्यातुन 8,13,927/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यातविमल, हिरा, आरएमडी कंपनीचा पानमसाला, विविध प्रकारची सुंगधीत तंबाखु, मोबाईल व एक सुझुकी कंपनीची इको कार एमएच-16-सीक्यु-8673 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पथकाने ताब्यातील आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता दिपक नाना टकले याने विमल व हिरा पानमसाला व त्याचे सोबतची सुगंधीत तंबाखु ही 3) अविनाश ढवळे पुर्ण नाव माहित नाही रा.भिगवन, इंदापूर, जि.पुणे (फरार) याचेकडून खरेदी केली आहे.तसेच आरएमडी पानमसाला व त्यासोबत सुगंधीत तंबाखु ही 4) नौशाद सिध्दीकी पुर्ण नाव माहित नाही रा.साळुमाळु, पारगाव, ता.दौंड, जि.पुणे (फरार) याचेकडून त्याचा कामगार 5) मिराज हमीद शेख, रा.टाकळीभिमा, ता.दौंड, जि.पुणे (फरार) याचेमार्फत खरेदी केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन त्यांचेविरूध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरनं 376/2025 बीएनएस 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3 (5) सह अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.