पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रसला दे धक्का : माझी नगराध्यक्षांसह शेकडो दिग्गजांचा भाजपात प्रवेश.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रसला दे धक्का : माझी नगराध्यक्षांसह शेकडो दिग्गजांचा भाजपात प्रवेश.
प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
सविस्तर_श्रीरामपूर येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलतांना, भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपण श्रीरामपूरमध्ये सातत्यानं लक्ष घालणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते, त्यांच्या वक्तव्याच्या काही तासानंतर श्रीरामपूर मध्ये राजकीय भूकंप होऊन, अनेक दिग्गजांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई येथिल भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, अहिल्यानगर चे प्रभारी विजय चौधरी, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस च्या अनेक दिग्गजांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारे श्रीरामपुर येथील पदाधिकारी, श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजयजी फंड, उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी, नगरसेवक श्यामलिंग शिंदे, आशीष धनवटे, राजू आदिक, कैलाश दुबय्या, सोमनाथ गांगड, संदेश गांगड, शशी रासकर यांच्यासह श्रीरामपुर पंचायत समिति उपसभापती सुनील क्षीरसागर, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन दिगंबर फरगडे, सरपंच विराज भोसले, शिरसगावचे उपसरपंच वैभव लोढ़ा, दत्ता डालपे, पराग शाह, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, योगेश डिम्बर, चिरायु नगरकर, सिद्धार्थजी फंड, मनोज लबाडे अमोल शेटे, सागर बर्वे, एड.वो.केट युवराज फंड माजी उपसरपंच शिरसगाव, निलेश बोरावके, चिरायू नगरकर, यांच्यासह श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील शेकडो पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करून शुभेच्छा दिल्या, तसेच येणाऱ्या काळात नक्कीच आपल्या सर्वांच्या प्रवेशाने श्रीरामपूर शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्ष हा अधिक बळकट होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.