‘ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी नराधम आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा '
अहमदनगर : आरोपी नामे सतीष बन्सी उमाप , वय - ३५ वर्षे , रा राहुलनगर , ता . पारनेर जि . अहमदनगर , याने अल्पवयीन पिडीत मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी भा.द.वि. कलम ३७६ , ३७६ ( २ ) ( एन ) , ३७६ ( ३ ) , लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ३,४,५ ( एल ) , ६ नुसार आरोपीस दोषी धरून २० वर्षे सक्त मजुरी व २,००० / - रूपये दंड , दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले .
घटनेची थोडक्यात हकीगत की ,
दि . १४.०४.२०१ ९ रोजी पिडीत मुलगी हिने पारनेर पोलिस स्टेशन येथे आरोपी सतीष बन्सी उमाप याचे विरूध्द फिर्याद दिली की , दिनांक १२.० ९ .२०१८ रोजी दुपारी २ च्या सुमारास ती व गल्लीतील इतर लहान - लहान मुले हे गणपती बसविण्यासाठी सतीष उमाप यांच्या वडिलांच्या घराशेजारी मंडप बांधत होते . गणपती डेकोरेशनसाठी तार घेण्यासाठी पिडीत मुलगी हि आरोपी सतीष बन्सी उमाप याच्या घराच्या मागिल बाजूस गेली . त्यावेळी आरोपी याने त्याचा घराचा पाठीमागचा दरवाजा उघडून पिडीत मुलीला त्याच्या घरात ओढून नेले . त्यानंतर त्याने तिला चाकु दाखवून तु जर ओरडली तर मी तुला मारून टाकेल अशी धमकी दिली . त्यानंतर आरोपी याने पिडीत मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्या घटनेचा त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले . सदरचे व्हिडीओ शुटींग पिडीत मुलीला दाखवले व पिडीत मुलीस आरोपीने धमकी दिली की , जर कोणाला काही सांगितले तर हे व्हिडीओ शुटींग गल्लीतील लोकांना दाखवले असे म्हणून घराच्या बाहेर काढून दिले . सदर घटनेनंतर आरोपी हा वेळोवेळी पिडीत मुलीला घटनेचा व्हिडीओ शुटींग लोकांना दाखविल अशी धमकी देवून तिला त्याच्या घरात बोलावून घेत असे व वारंवार तिचेवर शारीरिक अत्याचर करीत असे . पिडीत मुलीवर आरोपी हा सतत शारीरिक अत्याचार करत असल्याने पिडीत मुलगी ही आरोपी पासुन गरोदर राहिली सदरची बाब पिडीत मुलीच्या आईला समजल्यानंतर तिच्या आईने पिडीत मुलीकडे विश्वासात घेवून चौकशी केली असता , पिडीत मुलीने आरोपी हा वेळोवेळी तिला धमकी देवून केलेल्या शारीरिक अत्याचाराबाबत तिच्या आईला माहिती सांगितली . त्यानंतर पिडीत मुलगी व तिच्या आईने पारनेर पोलिस स्टेशनला जावून आरोपी विरुध्द फिर्याद दिली . पारनेर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गु.र.नं. ३५१ / २०१ ९ भा.द.वि. कलम ३७६ , ३७६ ( २ ) ( एन ) , ३७६ ( ३ ) , लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ३ , ४ , ५ ( एल ) , ६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ ई नुसार गुन्हा दाखल केला . सदर गुन्हयाचा संपूर्ण तपास पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक , बाजीराव पोवार यांनी करून मा . न्यायालयामध्ये आरोपी विरुध्द दोषारोपत्र दाखल केले . त्यानंतर पिडीत मुलीस गर्भवती होवून बराच कालावधी झालेला होता . त्यामुळे तिचा कायदयानुसार तसेच तिची शारीरिक परिस्थिती पाहता , गर्भपात करणे शक्य नव्हते . त्यामुळे पिडीत मुलगी ही वयाने लहान असल्याने दिवस पूर्ण भरलेनंतर तिचे सिव्हील हॉस्पिटल , अहमदनगर येथे सिझेरीयन करून बाळंतपण करण्यात आले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , तिची आई , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वैद्यकिय अधिकारी तसेच वयासंदर्भात नगर पंचायत पारनेर , डी.एन.ए. सॅम्पल घेवून जाणरे पोलिस कर्मचारी त्याचबरोबर नाशिक येथील वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञ यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला की , सदरची घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे . पिडीत मुलगी व आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत . त्यामुळे पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीस होती असे असतानाही , आरोपी याने बळजबरीने पिडीत मुलीवर शारीरिक अत्याचार केला त्याचबरोबर त्याचे व्हिडीओ शुटींग केले . सदर घटनेमध्ये आरोपीस शिक्षा झाली नाही तर समाजात अशा प्रकारच्या घटनेमध्ये वाढ होते . समाजातील विकृत लोकांना कायदयाची भिती राहणार नाही तसेच जरब बसणार नाही व पोक्सो कायदयाचे तसेच पोक्सो कोर्टाचे महत्व कमी होईल . पिडीत मुलगी ही आरोपीने केलेल्या शारीरिक अत्याचारामुळे गर्भवती राहिलेली होती . अत्यंत कमी वयात तिला आरोपीमुळे मातृत्व स्विकारावे लागले . त्याचबरोबर तिचे बाळंतपण करताना , तिचे सिझेरियन करावे लागले त्याबाबतच्या खुणा तिच्या पोटावर असल्याने ती मानसिकरित्या पुर्णपणे खचुन गेली . घटनेचा परिणाम तिच्या मनावर तसेच तिच्या भविष्यावर खोलवर झालेला आहे . अशा घटनेमध्ये कोर्टाने आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करणे अत्यंत गरजेचे आहे असा सरकारी वकीलांचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे सतीष बन्सी उमाप यास मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी गोडे , राठोड , दांगोडे , आडसुळ , त्याच बरोबर पारनेर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ . शिवनाथ एन . बडे यांनी सहकार्य केले .
अहमदनगर ता . १२/१०/२०२२
( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
विशेष सरकारी वकील , अहमदनगर .
मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५