महात्मा फुले कृषी विद्यापीठात श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची १९५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात श्री संत सावता माळी युवक संघ  महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची १९५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

*महात्मा फुलेंचे कार्य शेतक-यांना प्रेरणादायी- रसाळ सर ( विभाग प्रमुख)*

  

     *महात्मा फुले कृषी विद्यापीठ-श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे सालाबाद प्रमाणे “महात्मा फुले यांची १९५ वी जयंती” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.*

     *कार्यक्रमाप्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्याशाखेचे विभागप्रमुख श्री रसाळ साहेब , श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भुषण सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत राज्यसचिव सुनिल गुलदगड,सौ.उमाताई मेहेत्रे , युवा उद्योजक स्वप्निल भास्कर , श्री गाडगे महाराज आश्रम शाळेचे मा. मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी सर, वळण आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मंगेश पगारे सर, प्रा. धिवर,प्रा. महाविरसिंह चौहान, मनोज मेहेत्रे, देवीदास शेंडे, अक्षय मेहेत्रे, अमोल वाकचौरे, सुरक्षा अधिकारी शेटे साहेब,पत्रकार आर.आर.जाधव,सचिन पवार, अमोल पुजारी, गोरख पुंड, जगदिश धिवर , श्रीपत तरटे ,आदि मान्यवर उपस्थित होते.*

     *याप्रसंगी मा. रसाळसाहेब बोलताना म्हनाले कि “ महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य सर्व जगाला सर्वश्रुत असुन शेतक-यांना प्रेरणादायी असे कार्य आहे. शेतक-यांप्रती जे आपण काम करतो तेच खरं जर आपण प्रामाणिकपणे केले तर तीच खरी महात्मा फुलेंना आदरांजली ठरेल.*

     *यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड, उमाताई मेहेत्रे,जगन्नाथ सुर्यवंशी सर, पगारे सर यांनी भाषणातून महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली.*

    *यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संघाचे राज्यसचिव सुनिलभाऊ गुलदगड यांनी मानले.*